येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील अंदरसुल येथील जाधव वस्तीजवळ राहणारे शंकरराव गायकवाड कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी बंद घराचे कुलूप तोडुन घरातील कपाटात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना सह रोख रक्कम असा दीड लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. येवला तालुका पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.