इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील शिक्षण विभाग घोटाळा प्रकरणी ईडीने अभिनेत्री अर्पिता मुखर्जी च्या घरावर छापेमारी केल्यानंतर तिच्या घरात पैशांचा ढीगच आढळला होता. घरातील टॉयलेटमध्ये रोख रक्कम आणि सोने लपवण्यात आले होते. या नोटा मोजण्यासाठी ईडीच्या टीमला १० तासांहून अधिक वेळ लागला. पैसे मोजण्यासाठी अनेक मशिन मागवण्यात आल्या. आता मध्य प्रदेशातही असेच पैशांचे घबाड समोर आले आहे. साध्या क्लर्कच्या घरात अधिकाऱ्यांना नोटाच नोटा आढळून आल्या आहेत. त्याच्याकडे एवढे पैसै आले कुठून या विचाराने अधिकारीही चक्रावले आहेत.
राजधानी भोपाळमधील बैरागढ भागात आर्थिक गुन्हे शाखेने मोठा छापा टाकला आहे. एका लिपिकाच्या घरी हा छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ८५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत, याशिवाय सोने-चांदीही सापडले आहे. अजूनही त्याच्या घरी अधिकारी छापेमारी करत आहेत. एका लिपिकाची इतकी कमाई पाहून अधिकारीही चकित झाले. पहाटे ५ ते ६ वाजता अधिकारी या लिपिकाच्या घरी पोहोचले. आता १६ तासांनंतर अद्यापही त्या लिपिकाच्या घरी छापेमारी सुरु आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात बराच काळा पैसा सापडला सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे, इतकेच नव्हे तर एवढी संपत्ती पाहून तपासासाठी आलेले अधिकारीही चक्रावले. या लिपिकाच्या भोपाळ येथील घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. या हिरो केसवानीने ४ हजार रुपये प्रति महिना पगारावर नोकरी सुरू केली होती आणि सध्या त्याचा पगार ५० हजार रुपये प्रति महिना आहे.
अचानक धाडीत एवढा पैसा सापडल्याने खळबळ माजली आहे. एवढी मोठी रक्कम ब्रीफकेसमध्ये ठेवण्यात आली होती. ईओडब्ल्यू विभागाचे पथक बैरागढ येथील हिरो केसवानी यांच्या मिनी मार्केटमध्ये कारवाईसाठी पोहोचले असता त्याने तब्येत खालावली असल्याचा बाहणाही केला. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत फिनाईल प्यायल्याच्याही चर्चा रंगल्या. त्यानंतर त्याला तातडीने हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे चौकशी होऊ शकली नाही. मात्र केसवानीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ईओडब्ल्यूच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली आहे.
Nearly ₹ 80 lakh in cash recovered during a raid on Hero Keswani, a clerk in state health department at #Bhopal in #MadhyaPradesh. pic.twitter.com/rwijjbiDPA
— Siraj Noorani (@sirajnoorani) August 3, 2022
सातपुडा भवनमधील वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक हिरो केसवानी यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सातत्याने येत होत्या. यानंतर, ईओडब्ल्यूने तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर बुधवारी पहाटे बैरागढच्या मिनी मार्केटमधील हिरो केसवानी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान ईओडब्ल्यूचे १२ अधिकारी हिरो केसवानी यांच्या घरी पोहोचले. या लिपिकाच्या घरावर छापा टाकला.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या शिक्षण विभागात एक मोठा घोटाळा समोर आला आहे. त्यातही कोट्यवधी रुपये सापडले. या प्रकरणात अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी हे सध्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडेही पैशांचा मोठा ढिगच सापडला आहे. या घटनेने पुन्हा पश्चिम बंगालच्या घटनेची अनेकांना आठवण करून दिली, कारण पार्थ चॅटर्जींची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरावर ईडीने प्रथम छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीने २१ कोटी रुपये जप्त केले होते. त्यानंतर तिला ईडीने अटक केली. ईडीच्या चौकशीत अर्पिताने हे पैसे पार्थ चॅटर्जीचे असल्याचं कबूल केलं होतं. तसंच इतकी मोठी रक्कम ठेवण्यासाठी तिच्या घराचा वापर केल्याचंही तिने सांगितलं. त्यानंतर २७ जुलै रोजी ईडीने अर्पिताच्या आणखी एका घरावर छापेमारी केली. त्यावेळी ईडीला २९ कोटी रुपये रोख आणि ५ कोटींचं सोनं सापडले होते.
Bundle of Notes Found in Clerk Home Raid
Madhya Pradesh Bhopal Economic Offence Wing
85 Lakh Rupees Cash Found