मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही आयफोन घेण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. कारण, आयफोनवर केवळ एक-दोन हजारांची नाही तर तब्बल २४ हजारांची सूट मिळणार आहे. ७९,९०० रुपयांमध्ये येणारा आयफोन आता ५५,९०० रुपयांमध्ये तुमचा असेल. अॅपलता चा शानदार स्मार्टफोन तुम्ही ऑफर्स आणि डील्ससह २४ हजार रुपयांपर्यंतच्या सूट मध्ये खरेदी करू शकता. अॅपलच्या इंडियन स्टोअर मध्ये आयफोन 13 वर पहिल्यापासूनच आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना कॅशबेक ऑफर आहे. या सोबतच जर बोनस आणि एक्स्चेंज डिस्काऊंट एकत्र केले तर तुम्हाला हा फोन २४ हजार रुपये स्वस्तात मिळेल.
आयफोन 13 चा 128 GB स्मार्टफोन आय स्टोअरमध्ये ७९,९०० रुपयांत उपलब्ध आहे. जर तुम्ही तो खरेदी करतांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला ६ हजारांची सूट मिळेल. आयफोन 13 ला एक्स्चेंज ऑफरचे सुद्धा बरेच फायदे आहेत. तुम्ही जर तुमचा जुना आयफोन ट्रेड इन स्कीम अंतर्गत एक्स्चेंज केल्यास तुम्हाला आकर्षक सवलत देखील मिळू शकते. एक्स्चेंज ऑफर्स मध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात आयफोन 13 वर सुमारे १५ हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.
याबरोबर जर तुम्ही तुमचा जुना आयफोन XR 64 GB एक्स्चेंज करत असाल तर तुम्हाला आणखी तीन हजारांची सवलत मिळू शकते. ही ऑफर आयफोन 13 मिनी,13 प्रो, आणि 13 प्रो मैक्स वर सुद्धा लागू होते. परंतु या सगळ्या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही ७९,००० रुपयांचा आयफोन ५५,९०० रुपयांत खरेदी करू शकता.