पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मावळ येथे बैलगाडा शर्यतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय बैलगाडा संघटना मावळ तालुका तसेच मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीतर्फे ही बैलगाडा शर्यत घेण्यात आली. इंदोरी (ता. मावळ, जिल्हा पुणे) येथे झालेल्या या शर्यतीत शेतकऱ्यांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. परिसरातील शेकडो शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. या शर्यतीस माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शर्यतीचा थरार दाखविणारा हा व्हिडिओ
Enthusiasm of farmers at the bullock cart race !
बैलगाडा शर्यतीत शेतकऱ्यांचा उत्साह !#Pune pic.twitter.com/jgQAiBBjsF— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 21, 2022