नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. आणि आता या शर्यतीवर सर्वोच्च मोहर उमटली आहे. राज्य सरकारने केलेला कायदा वैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी या शर्यती पुन्हा सुरू होणार आहेत.
तब्बल १२ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. बैल, गाय, घोडा आदी प्राण्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. मात्र, प्राण्यांचे आतोनात हाल होतात. पर्यावरणीय कायद्यांच्या आधारे न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातली होती.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1659076322822443009?s=20
जल्लीकट्टूला खेळ म्हणून मान्यता देणारा तामिळनाडू सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की तामिळनाडू क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट (सुधारणा), २०१७7 प्राण्यांना होणाऱ्या वेदना आणि वेदनांना मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार ठरवते.
Bullock Cart Racing Supreme Court Order