मुकुंद बाविस्कर, मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
संपूर्ण देशभरात खळबळ माजविणाऱ्या ‘बुली बाई अॅप’च्या गुन्ह्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला तडा देण्याचा प्रयत्न यात करण्यात येत होता. परंतु उत्तराखंडमधील रुद्रपूर शहरातून एका १८ वर्षीय तरुणीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणीचा आक्षेपार्ह ‘बुली बाई’ अॅपमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. मात्र ही महिला या अॅपची मास्टरमाईंड असल्याचे मानले जात आहे, जिने अॅपवर मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपलोड करून त्याचा लिलाव केला होता.
सिव्हिल इंजिनीअरला अटक
मुंबई पोलिसांनी आक्षेपार्ह सोशल मीडिया अॅपच्या ‘बुल्ली बाई’ प्रकरणामध्ये आतापर्यंत दुसऱ्या व्यक्तीला अटक केली असून यापूर्वी कर्नाटकात सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या २१ वर्षीय विशाल कुमारला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. विशाल कुमारला दि. १० जानेवारीपर्यंत मुंबई पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, न्यायालयात हजर राहताना विशालने आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या सायबर टीमने ही कारवाई केलीआहे.
तरूणीची भूमिका
आता मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथून एका१८ वर्षीय तरूणीला अटक केली असून ती १२वी उत्तीर्ण असून उधम सिंह नगर जिल्ह्यातील स्थानिक न्यायाधीशासमोर हजर करण्यात आले. बुली बाय अॅप प्रकरणातील आरोपी तरूणीची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्याच्या कथित भूमिकेबाबत कोणतीही माहिती देण्यास मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला. तसेच उत्तराखंड पोलिसांनी आरोपीची चौकशी केली नाही कारण तपास फक्त मुंबई पोलिस करत असून त्यांना या प्रकरणाचा तपशील माहित आहे, मात्र मुंबई पोलीस अजूनही आणखी तपास करत आहेत.
पोलिसांचे प्रयत्न
उत्तराखंडचे पोलिस प्रमुख म्हणाले की, उत्तराखंड पोलिसांनी केवळ आमच्या एका महिला कॉन्स्टेबलला आरोपींना पकडण्यासाठी पाठवून मुंबई पोलिसांना मदत दिली. कारण त्यांच्या टीममध्ये कोणीही माहिला नव्हती, त्यानंतर तिला चौकशीसाठी मुंबईला नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळविण्यासाठी पथकाने स्थानिक न्यायालयात हजर केले.
बुली बाई अॅप
‘बुली बाई’ हे एक अॅप असून ते Github API वर होस्ट केले होते. अलीकडेच या अॅपची सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली. त्यामध्ये प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय अपलोड करून त्यांचा लिलाव करण्याचा पर्याय लोकांना देण्यात आला होता. बुली अॅप हे सुली डील्स अॅपप्रमाणे असून बुली बाई अॅप देखील GitHub वर तयार केले गेले होते, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे दि. १ जानेवारीला ही बाब पहिल्यांदा समोर आली. आरोपींनी अनेक मुस्लिम महिलांच्या छायाचित्रांशी छेडछाड केली होती आणि ती बुली बाई अॅपवर लिलावासाठी ठेवली होती. यामध्ये विशेषतः अशा महिलांना टार्गेट करण्यात आले जे सामाजिक प्रश्नांवर सक्रिय आहेत. मात्र या अॅपला विरोध सुरू झाल्यानंतर आता ते हटवण्यात आले असून त्याच्याशी संबंधित ट्विटर अकाउंटही बंद करण्यात आले आहे.
आरोपीपर्यंत कसे पोहोचले?
महाराष्ट्र पोलिसांनी बुली बाई अॅप प्रकरणात रुद्रपूरच्या श्वेता सिंगला अटक केली. तेव्हा ती अॅपशी जोडलेली तीन अकांऊट हाताळत असल्याचे आढळून आले. या आधारे ग्रुप अॅडमिनशिवाय अटक करण्यात आलेल्या श्वेताला मुख्य आरोपी मानले जात आहे. तपासात उघडकीस येताच अनेक सदस्यांनी आपआपले मोबाईल बंद केले होते. मात्र रुद्रपूर येथील श्वेता सिंहचा मोबाईल चालू होता. त्याआधारे महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवून रुद्रपूर येथे आल्यानंतर आरोपी तरुणीला अटक केली. नेपाळ, दिल्ली, महाराष्ट्र, बेंगळुरू व्यतिरिक्त अनेक राज्यांतील सुशिक्षित तरुण अॅपशी जोडले गेले आहेत.
सोशल साइट्सवर मैत्री
महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले की, बंगळुरू येथून अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी विशाल कुमार झा हा विद्यार्थी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर श्वेताच्या संपर्कात होता. त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विशालला महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. चौकशीदरम्यान रुद्रपूरच्या श्वेता सिंगचे नाव समोर आले. सोशल साइट्सवर दोन्ही आरोपींची मैत्री झाल्यानंतर ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते. याला सोशल साइट्सवरून सीडीआर आणि महाराष्ट्र पोलिसांनी दुजोरा दिला. विशाल कुमार झा याने खालसा सुप्रिमेसिस्ट नावाने खाते तयार केले होते.
पैसे कमविण्याचा लोभ
बुली बाई अॅप प्रकरणात अडकलेल्या श्वेता सिंगने कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे. कारण या आरोपीच्या कुटुंबाची अवस्था पाहिली तर आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर तिची लहान बहीण आणि भाऊही चिंतेत होते. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या इच्छेने श्वेता याकडे वळली असावी. आधी त्यांचे कुटुंब सुखी जीवन जगत होते. मात्र आई-वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी श्वेताच्या मोठ्या बहिणीवर आणि स्वतः श्वेता यांच्यावर येऊन पडली. तीन बहिणी आणि एका भावाच्या शिक्षणाची आणि कुटुंबाचा नियमित खर्च याची श्वेताला खूप काळजी होती. कुटुंबाला बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आरोपी श्वेताने हा मार्ग अवलंबला असावा. बुली बाई अॅपच्या माध्यमातून कमी वेळात पैसे कमवायचे होते आणि ती यात अडकली आहे.
प्रकरण दाबले
अॅप सायबर क्राईमद्वारे बुलीतील आरोपी श्वेताला अटक केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. श्वेता सिंगला अटक होऊन पाच तास उलटले तरी स्थानिक पोलिसांनी दुसऱ्या राज्यातील पोलिसांना येण्याची परवानगीही दिली नाही, मात्र मुंबई पोलिसांच्या पथकाने आरोपी तरुणीला न्यायालयात हजर केले तेव्हा संपूर्ण प्रकरण वरिष्ठ पातळीवरून उचलण्यात आले. दरम्यान स्थानिक पोलीसही आता सक्रिय झाले आहेत. स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाशी संबंधितांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
सायबर तपास सुरू
मुंबई पोलिसांच्या वतीने अॅपद्वारे एका विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्याबाबत दिलेली माहिती गोळा केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुलीशी संबंधित प्रत्येक बाबी स्थानिक पोलीस तपासणार आहेत. या प्लॅटफॉर्मवरील तिचा फोटो एका कडे असल्याचा कळले तेव्हा तिने दिल्ली सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसेच शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे उचलून धरत दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.