बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हयातील मलकापूर – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपूलानजीक दुचाकीचा भिषण अपघात झाला. नांदुरा – मोताळा मार्गा दरम्यान दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे भाऊ जागीच ठार झाले आहे. यात दोघे सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ होता. या भयानक वाईट घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरील अपघातात वाढ झाली आहे.
मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील तिघे चुलत भाऊ अनोराबाद येथून आंबोला जात असताना नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर काल ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास दुचाकीने एका ट्रकला धडक दिली. या ट्रकचा क्रमांक एमएच २८ बीएन २७३९ असा असून नांदुरा – मोताळा मार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये उमेश विठ्ठल कांढरकर (२३), प्रशांत किसन कांढरकर (२३), नितीन किसन कांढरकर (२६) यांचा जागीच मृत्यू झाला. या मृतात दोन भाऊ तर तिसरा चुलत भाऊ आहे. हे तिघे तरूण अविवाहीत होते.
अपघाताची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्ते रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाले. तसेच या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या तिघांचे मृतदेह एका रूग्णवाहिकेव्दारे त्यांच्या घरी नेण्यात आले. या दुर्घटनेमुळे कांढरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमदार राजेश शेकडे यांनी घटनास्थळावर तात्काळ मदत उपलब्ध करून दिली. बहिणीला भेटून गावी परत जात होते, या भयानक घटनेमुळे झोडगा गावावर सणासुदीच्या काळात दुःखाचे सावट पसरले आहे तसेच सर्व स्तरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
Buldhana Road Accident Three Brother Death Truck Two Wheeler