मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक जण नोकरी, व्यवसाय किंवा शेती करताना अन्न आणि वस्त्र या गोष्टी सहजपणे उपलब्ध करू शकतो. मात्र निवारण तोही स्वतःचा हक्काचा असण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो, मात्र आता आपल्या स्वप्नातील घर साकार होण्यास फारसा वेळ लागणार नाही, कारण बांधकामाच्या साहित्याची तर काहीसे घसरले आहेत, त्यामुळे नवीन घर घेणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे असे दिसून येते
पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणारा अबकारी कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी पर्यायाने वाहतुकीचे दर स्वस्त झाले आहेत. दुसरीकडे स्टीलच्या निर्यातीवर आकारण्यात येणारा उच्च कर आणि पावसाळा मधील मंदी यामुळे तुमचे स्वप्नातील घर अधिक स्वस्त दरात निर्माण होऊ शकते.
स्टीलच्या निर्यातीवर सध्या अधिक कर आकारण्यात येत असल्याने परिणामी निर्यातीवर बंधने आली आहेत. त्यामुळे स्टील स्वस्त झाले आहे. दुसरीकडे घर बांधण्यासाठी आवश्यक मुलभूत गोष्टी जसे सळ्या, सिमेंट , वाळू आणि विटांचे दर देखील घसरले आहेत. त्यामुळे आता नवीन घर बांधण्यासाठी अनुकूल काळ निर्माण झाला आहे.
जुलै महिन्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने पावसाळ्याचा घराच्या बांधकामांवर पाऊस पडल्यामुळे थेट परिणाम होतो. बांधकाम क्षेत्रातील कामे थंडावतात. पावसाळ्यात बांधकाम क्षेत्रासाठी लागणारी वाळू, सिमेंट आदींची कमतरता सुरु होते. परिणामी यांच्या भावात चांगलीच वाढ होते. नदीला पूर आल्याने वाळूही मिळत नाही. त्याचा ही परिणाम बांधकामांवर दिसून येतो. वाळू आणि सिमेंटचे दर वाढतात. बांधकाम साहित्य यंदा ते मार्च व एप्रिल महिन्यात खूप वाढले होते. गेल्या महिन्यात देशातील विविध शहरात सळईचा दर ४५०० रुपये प्रति टन महाग होता. त्यानंतर भावात कमालीची घसरण झाली. परंतू आता सळई, सिमेंट आणि वीट ही स्वस्त झाली आहे.
आता या काळात कोणी घर बांधायला सुरुवात केली असेल तर दर वाढण्यापूर्वी त्वरीत बांधकाम साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे, अन्यथा पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. घराचे बांधकाम करताना साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ होते. वीट, सळई आणि सिमेंटच्या किंमतीत वाढ होते. सध्या विशेषतः सळईचे भाव झपाट्याने उतरले. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सळईची दर घसरण सुरुच आहे.
मार्च महिन्यात देशातील काही भागात सळईच्या किंमती 85 हजार रुपये टनापर्यंत गेल्या होत्या. सध्या देशातील विविध शहरात सळईचा भाव 49,000 ते 59,000 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मुंबईचा विचार करता, जून महिन्यात सळई प्रति टन 55,200 रुपये दराने मिळत होती. त्यात 400 रुपयांची घट झाली असून भाव प्रति टन 54,800 रुपये झाले आहेत.
गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये सिमेंटच्या दरात देखील घसरण झाली होती. सिमेंटचा दर प्रति बॅग 60 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. बिर्ला सिमेंटची एक बॅग पूर्वी चारशे रुपयांना मिळत होती. तीच्या भावात वीस रुपयांची घसरण झाली असून, ती 380 रुपयांवर पोहोचली आहे. एसीसी सिमेंटचा दर 450 रुपयांहून 440 रुपयांवर पोहोचला आहे. सिमेंटप्रमाणेच वाळू आणि विटांचे दर देखील स्वस्त झाले आहेत. त्यामुळे हा काळ घर बांधण्यासाठी अनुकूल असून, आपण खर्चात मोठी बचत करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Building Material construction raw materials rates reduce