नाशिक – नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने २९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बोरगड परिसरातील प्रगतीनगर भागात घडली. या घटनेने पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजाहिद साबीर शेख (रा.मुलतानपुरा जुने नाशिक) असे इमारतीवरून पडल्याने मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुजाहिद शेख हा कामगार शुक्रवारी (दि.६) दुपारच्या सुमारास प्रगती नगर भागात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या बहुमजली इमारतीवर काम करीत असतांना ही दुर्घटना घडली. पाचव्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर पडला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने बांधकाम व्यावसायीक राहूल अरूण पवार यांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.