शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईत मुसळधार पावसाने मालाडमध्ये इमारत कोसळली ; ११ जण ठार, ७ जण जखमी…

जून 10, 2021 | 6:27 am
in संमिश्र वार्ता
0
malad

सहा वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश…
 विशेष प्रतिनिधी / मुंबई :
या वर्षातील पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली असून संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. त्यातच रात्री पावसामध्ये मालाड भागात एक चार मजली इमारत असून ११ जण ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनेत अडीच वर्षाच्या चिमुकलीची मात्र सुटका करण्यात पथकाला यश मिळाले आहे. ‘दैव तारी त्याला कोण मारी ‘ असे या बाबतीत म्हटेल जात आहे .
मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईत संकट ओढवले असून मालाड पश्चिम भागात काल बुधवारी ( दि. ९ ) रात्री चार मजली निवासी इमारत कोसळल्याने ११ जण जागीच ठार तर अनेक जखमी झाले. दरम्यान, पालकमंत्री अस्लम शेख यांनी दुर्घटना स्थळाला भेट दिली. पावसामुळे इमारती कोसळल्या नंतर आता बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या इमारतीखाली आणखी लोक त्याखाली अडकले आहेत का हे पाहण्यासाठी इमारतींचा मलबा काढला जात आहे.
या दुर्घटनेत महिला व बालकांसह १८ जणांना वाचविण्यात आले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकण्याची शक्यता असल्याने बचावासाठी अग्निशामक दल तसेच मदत आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे
रात्रीपासून सुरू झालेले अग्निशमन दलाने शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे.
नागरी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही इमारत एका दुमजली इमारतीत कोसळली त्यालगतची तीन मजली इमारतही अस्थिर होती,  बुधवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास मालवणी परिसरातील अब्दुल हमीद रोडच्या नवीन जिल्हाधिकारी कंपाऊंडमध्ये हा अपघात झाला. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी व अन्य एजन्सी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव व शोधमोहीम सुरू केली. या अपघातात आठ मुले आणि तीन प्रौढांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ, नऊ आणि १३ वर्षांच्या ३ मुलांची ओळख पटली आहे.  इतर आठ जण ओळखले जात आहेत.  अन्य जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आणि त्यामुळे रस्ते व रेल्वे रुळही बंद पडले. याशिवाय, ठाण्यातही भिंती कोसळण्याच्या तीन घटना घडल्या आहेत, मात्र कोणीही जखमी झाले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील कोळगाव गावात पूल कोसळला परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईत  मुसळधार पावसामुळे  सर्वत्र पाणी असल्याने मुंबईची जीवनरेखा असणाऱ्या लोकल ट्रेनचे कामकाज विस्कळीत झाले आणि चार भुयारी मार्गही बंद करावे लागले.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग बुधवारी पाण्यात बुडाला.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधील ट्रॅक पाण्यात बुडाले.  ज्यामुळे ठाणे व वाशीसाठी लोकल गाड्यांचे कामकाज ठप्प झाले.  त्याचप्रमाणे बेस्ट बसेसचा मार्गदेखील बदलावा लागला.  महानगरातील चार भुयारी मार्गही पाण्यामुळे कोसळल्याने बंद करावे लागले.
तसेच सखल भागातील लोकांच्या घरात पाणी शिरले.  हवामान खात्याच्या माहितीनुसार सांताक्रूझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १६४ मिलीमीटर पाऊस पडला.  दरम्यान, समुद्रात ४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या.  मुंबईतील जलसाठ्याच्या परिस्थितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.  ठाकरे यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्हा दंडाधिकाऱ्याशीही चर्चा केली. हवामान खात्याचे (आयएडी) मुंबई कार्यालय प्रमुख डॉ. जयंत सरकार म्हणाले, मान्सून आला आहे.  येत्या ४८ तासात मुंबई शहर व उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये  ३६९ ने घट, ४ हजार ८९२ रुग्णांवर उपचार सुरू

Next Post

लासलगाव – विद्युलता बाळासाहेब शेखर पाटील यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20210610 WA0127 e1623308831795

लासलगाव - विद्युलता बाळासाहेब शेखर पाटील यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011