इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशमधील शामली येथे एक रंजक प्रकरण समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी घरातून म्हशीचे पिल्लू चोरीला गेले होते. तीन महिन्यांपूर्वी ते पिल्लू सहारनपूरमधील एका गावात असल्याचे समजले आणि म्हशीच्या मालकाने ते गाव गाठले. परंतु ज्या कुटुंबाकडे ते पिल्लू आहे त्यांनी त्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर मालकाने त्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकाच म्हशीच्या रेडकूवर दोन मालकांनी दावा केला आहे. परिणामी, खरा मालक कोण याची उत्कंठा सर्वांना लागली आहे.
हे प्रकरण उण तालुक्यातील अहमदगड गावचे आहे. या प्रकरणी चंद्रपाल कश्यप सांगतात की, २५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री त्यांच्या गोठ्यातून म्हशीचे पिल्लू चोरीला गेले. त्याने बरेच दिवस शोध घेतला. या चोरीत कुटुंबातील एका सदस्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले, पिकअप चालक अरविंद, विनोद आणि हारून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपालने सांगितले की, तीन महिन्यांनंतर सहारनपूरच्या बीनपूर गावात सतवीरच्या घरी म्हशीचे पिल्लू असल्याचे समजले. गुरुवारी, एसपीच्या आदेशानुसार, पशुवैद्यकांचे पथक डीएनए चाचणीसाठी शामली आणि सहारनपूर येथे पोहोचले आणि म्हशी आणि तिच्या बाळाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे.
म्हशीचे पिल्लू सहारनपूरमध्ये आहे याची माहिती मिळताच चंद्रपाल सहारनपूरला पोहोचला आणि म्हशीचे पिल्लू परत करण्यास सांगितले मात्र सतवीरने नकार दिला. त्यावर त्यांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. एसपींच्या आदेशानुसार, बिडोली पोलिस चौकीचे प्रभारी अरुण कुमार मौताला यांच्यासह पाच पशुवैद्यकांचे पथक अहमदगड चंद्रपाल यांच्या घरी पोहोचले. सहारनपूरच्या बीनपूर गावात सतपालच्या घरी पोहोचल्यानंतर टीम सदस्य चंद्रपाल यांच्यासह त्यांनी म्हशीच्या पिल्लाच्या रक्ताचा नमुना घेतला. या प्रकरणी बिडोली चौकीचे प्रभारी अरुण कुमार यांनी सांगितले की, सतपाल यांना म्हशीच्या पिल्लाबाबत विचारले असता, ते कोणतेही योग्य उत्तर देऊ शकले नाही. अहमदगडचे चंद्रपाल आणि सहारनपूरच्या बीनपूर गावचे रहिवासी म्हशीच्या बाळावर आपला हक्क मांडत आहेत. एसपी सुकीर्ती माधव यांनी म्हैस आणि तिच्या बाळाची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रक्रिया करण्यात येत आहे.