पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार कंपनीने खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक प्रकारचे नवीन प्लॅन ग्राहकांसाठी आणले आहेत. परंतु आता बीएसएनएल ग्राहकांसाठी फायदेशीर असलेला प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2399 रुपयांचा हा प्लॅन आज समाप्त होत आहे. मात्र त्याचबरोबर अन्य काही फायदेशीर प्लॅन मात्र सुरूच राहणार आहेत.
बीएसएनएल दीर्घकालीन प्रीपेड प्लॅनसह 425 दिवसांची वैधता ऑफर करत आहे. इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी सध्या मोबाईल वापरकर्त्यांना 365 दिवसांपेक्षा जास्त वैधता देत नाही. वास्तविक 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची आधी 365 दिवसांची वैधता दिली जात होती. परंतु कंपनीने त्याची वैधता 60 दिवसांसाठी वाढवली होती. आता हा प्लॅन आजपासून (१५ जानेवारी) बंद होत आहे.
2399चा प्लॅन
2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 425 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 3GB हाय-स्पीड डेटा दिला जातो, म्हणजेच एकूण या प्लॅनमध्ये 1,275GB इंटरनेट मिळते. OTT फायदा म्हणजे तुम्हाला लगेचच Eros Now Entertainment चे सदस्यत्व मिळेल आणि वैयक्तिकृत रिंग बॅक टोन (PRBT) सोबत अमर्यादित गाणे बदलण्याचा पर्याय देखील दिला जातो.
अन्य वार्षिक योजना
बीएसएनएल च्या दीर्घकालीन वैधतेसह येणाऱ्या प्लॅनच्य यादीमध्ये 1499 रुपयांचा प्लॅन देखील समाविष्ट आहे. जो 24GB डेटा, मोफत व्हॉइस कॉल आणि 100 SMS प्रतिदिन देतो. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे.
1999ची योजना
यात 500GB नियमित डेटासह 100GB अतिरिक्त डेटा ऑफर करण्यात येतो. त्यात वेग 80Kbps पर्यंत कमी होतो. कोणत्याही FUP मर्यादेशिवाय कोणत्याही नेटवर्कवर खरोखर अमर्यादित व्हॉइस कॉल देते. ही योजना कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 एसएमएस देते. हा प्लॅन 365 दिवसांसाठी Eros Now Entertainment चे सबस्क्रिप्शन देते.
बीएसएनएलकडे 1498 रुपयांचे प्रीपेड वार्षिक डेटा व्हाउचर आहे. डेटा व्हाउचरमध्ये दररोज 2GB डेटा येतो. हा प्लॅन केरळ सर्कलमध्ये लागू आहे आणि 24GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 100 SMS प्रतिदिन ऑफर करतो.