पुणे – गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढतच असून भाजीपाला, फळे असो की इंधन म्हणजे पेट्रोल-डिझेल असो. याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढतच आहेत. त्या पाठोपाठ आता टेलिकॉम कंपन्यांनी देखील आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र त्याचवेळी सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे.
रिलायन्स – जिओ, व्होडाफोन -आयडीया ( व्हीआय ) आणि एअरटेल यांनी प्री-पेड प्लॅनच्या किमती एकाच वेळी वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्यांनी सर्व प्री-पेड प्लॅनच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मात्र या तीन टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त प्री-पेड प्लॅन आणला आहे. या परवडणाऱ्या प्लॅनने जीओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या-
बीएसएनएलचा 94 चा प्लॅन
बीएसएनएलच्या 94 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75 दिवसांची कमाल वैधता ऑफर केली जाते. 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कोणत्याही प्री-पेड प्लॅनमध्ये 75 दिवसांची वैधता दिली जात नाही. तसेच या प्लॅनमध्ये 3GB डेटा देखील दिला जात आहे. त्याच कॉलिंगसाठी 100 मिनिटे दिली जात आहेत. तर 100 मिनिटांनंतर, हा प्लॅन वापरकर्त्यांना 30 पैसे प्रति मिनिट दराने शुल्क आकारले जाईल. याशिवाय कॉलर ट्यून सुविधा 60 दिवसांसाठी उपलब्ध आहे.
जिओ आणि एअरटेल यांची स्पर्धा
जिओद्वारे 75 रुपयांमध्ये 24 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. हा प्लॅन खासकरून जिओ फोन वापरकर्त्यांसाठी आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एमबी डेटा उपलब्ध आहे. तसेच 200MB अतिरिक्त डेटा ऑफर केला आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2.5 GB डेटा उपलब्ध आहे. तर कॉलिंगसाठी अमर्याद टॉक टाइम आणि 50 एसएमएस उपलब्ध आहेत. तसेच या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड देण्यात आले आहेत. एअरटेलचा 75 रुपयांचा कोणताही रिचार्ज प्लॅन नाही. एअरटेलचा सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग प्लॅन 99 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या 99 रुपयांच्या टॉक-टाइममध्ये 200MB डेटा आणि दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे.