पुणे – खासगी आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच स्पर्धा दिसते. यात भारत दूरसंचार निगम निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल देखील वेगवेगळे प्लॅन नेहमीच आणत असते. आता देखील बीएसएनएलने पुन्हा आज त्यांच्या सर्वात लोकप्रिय प्रमोशनल भारत फायबर (FTTH) ब्रॉडबँड प्लॅनपैकी एक, फायबर एक्सपिरियन्स Rs 399 ही योजना पुढील 90 दिवसांसाठी तत्काळ प्रभावाने पुन्हा लॉन्च करण्याची घोषणा केली.
विशेष म्हणजे BSNL ने सुरुवातीला हा प्लॅन गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ टेलिकॉम सर्कलमध्ये लॉन्च केला होता. मात्र ही योजना 17 ऑक्टोबर 2021 रोजी संपुष्टात आली कारण 90 दिवसांची जाहिरात वेळ संपली होती. आता पुन्हा बीएसएनएलने 90 दिवसांसाठी हाच प्लॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
399 प्लॅन
BSNL Fiber Experience FTTH प्लॅन 30 Mbps डाउनलोड स्पीड 1000 GB पर्यंत डेटा वापर देईल. तसेच 1000GB नंतर स्पीड 2Mbps पर्यंत खाली येईल. ‘फायबर एक्सपिरियन्स 399’ प्लॅन निवडणारे ग्राहक 6 महिन्यांनंतर आपोआप फायबर बेसिक 449 प्लॅनवर स्विच करतील. ‘फायबर एक्सपिरियन्स 399’ कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित व्हॉइस कॉलसह देण्यात येतो.
नियम आणि अटी
हा प्लॅन फक्त नवीन ब्रॉडबँड ग्राहकांसाठी उपलब्ध असेल आणि 90 दिवसांच्या कालावधीसाठी प्रमोशनल ऑफरच्या आधारावर उपलब्ध असेल. 399 रुपये शुल्क जीएसटी वगळून आहे. ही योजना आजपासून लागू करण्यात आली आहे, जर आपल्याला हवे असेल तर या प्लॅनसाठी ऑनलाइन रिचार्ज देखील करू शकता.