विशेष प्रतिनिधी, पुणे
सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सर्वात स्वस्त ५०० रुपयांत ब्रॉडबँड योजना पुन्हा सुरू केली. बीएसएनएलने ९ जुलै पासून ६ ऑक्टोबरपर्यंत आपल्या सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ब्रॉडबँड इंटरनेट योजना, फायबर बेसिक, फायबर व्हॅल्यू, फायबर प्रीमियम आणि फायबर अल्ट्रा वाढवण्याची घोषणा केली.
४९९ रुपयांची फायबर बेसिक प्लॅन ऑफर
पूर्वीची ४४९ रुपयांची फायबर बेसिक योजना ही ग्राहकांची सर्वात पसंतीची योजना आहे. पण आता ४४९च्या योजनेत (फायबर बेसिक प्लॅन) एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता या योजनेची निवड करणाऱ्या ग्राहकांना ६ महिन्यांनंतर फायबर बेस प्लस ४९९ योजनेवर स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांच्या आवडीनुसार समान योजना सुरू ठेवू शकतात. मात्र नव्या फायबर बेसिक योजनेसाठी वार्षिक पेमेंट देखील केले जाऊ शकते, याचा फायदा म्हणजे १२ महिने शुल्क आकारले जाईल आणि ही योजना १३ महिन्यांसाठी चालेल. या योजनेचा फायदा फक्त ६ ऑक्टोबर पर्यंत घेतला जाऊ शकतो.
४९९ च्या योजनेचे इतर फायदे
बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या योजनेच्या फायद्यांविषयी चर्चा या योजनेत मोबाईल वापरकर्त्यांना ३० एमबीपीएस गतीसह ३३०० जीबी डेटा देण्यात येणार आहे. एफयूपी मर्यादा संपल्यानंतर, हा वेग २ एमबीपीएस होईल. या योजनेमुळे भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
ही योजना आली परत
बीएसएनएलने अलीकडेच ३९८ रुपयांची योजना परत आणत आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. ही योजना अमर्यादित डेटा आणि विनामूल्य व्हॉईस कॉलिंगसह येते. योजनेनुसार, वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस मिळतात. या योजनेची वैधता ३० दिवसांची आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एफओपी मर्यादेची चिंता न करता वापरकर्ते या ३० दिवसात अमर्यादित डाउनलोड आणि अपलोड करु शकतात.