मुंबई – भारत संचार निगम लिमिडेट अर्थात बीएसएनएलने १ मे पासून काही रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केला आहे. खासकरुन पतंजलीच्या ग्राहकांचे हे प्लॅन आहेत. ज्यांचे प्लॅन यापूर्वी १४४, ७९२ आणि १५८४ रुपयांचे होते त्यांचे प्लॅन १ मे पासून अनुक्रमे १६९, ९३० आणि १८५९ रुपयांचे झाले आहेत. या प्लॅनवर मिळणारे लाभ तसेच असतील. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, किंमत वाढूनही प्लॅनमधील सुविधा त्याच आहेत. तसेच, रिचार्ज केल्यानंतर बीएसएनएलने ग्राहकांना कॉर्पोरेट कॉलर ट्यून फ्रीमध्ये दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.