पुणे – खासगी टेलिकॉम कंपन्यांची स्पर्धा करण्यासाठी आता भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या वतीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. BSNL ने मोबाईल वापरकर्त्यांसाठी नवीन भारत फायबर FTTH ब्रॉडबँड योजना आणली आहे. यामध्ये के-इन प्लॅन G5, Sony Liv Premium सारख्या अनेक OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन आणि डेटासह 2000GB पर्यंत मोफत कॉलिंग देखील ऑफर करण्यात येतो. कंपनीचे हे दोन प्लॅन 749 आणि 949 रुपयांमध्ये आहेत. तसेच कंपनीने देशातील सर्व मंडळांच्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी या योजना सुरू केल्या आहेत. या योजना 5 ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत.
749 प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनचे नाव सुपरस्टार प्रीमियम -1 प्लॅन असून यामध्ये कंपनी 100Mbps च्या स्पीडने 1000 GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 5Mbps असेल. या योजनेत कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे.
949 प्लॅन
बीएसएनएलच्या या एफटीटीएच प्लॅनचे नाव सुपर स्टार प्रीमियम -2 आहे. या प्लॅनमध्ये 150Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. यामध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी 2000GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 10Mbps पर्यंत कमी होते. यामध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग मिळेल.
व्हीओओटी सिलेक्टची मोफत सदस्यता
कंपनी दोन्ही योजनांमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील देत आहे. यामध्ये सोनी लिव्ह प्रीमियम आणि जी 5 प्रीमियम आणि व्हीओओटी सिलेक्टची मोफत सदस्यता देखील समाविष्ट आहे. बीएसएनएलच्या या दोन्ही योजनांसाठी, वापरकर्त्यांना किमान एक महिन्याची सुरक्षा ठेव ( शुल्क )भरावी लागेल. या व्यतिरिक्त, या योजनांना एक महिन्यासाठी सदस्यता घ्यावी लागेल.