पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल वापरणे ही अत्यावश्यक गरज बनल्याने विविध टेलिकॉम कंपन्यांचा मोठा फायदा होत आहे. त्यातच त्यांच्यामध्ये मोठी स्पर्धा देखील दिसून येते. विशेषता सरकारी मालकीची बीएसएनएल कंपनी आणि जिओ रिलायन्स, एअरटेल, वोडाफोन – आयडीया यासारख्या खासगी कंपन्यांमध्ये स्पर्धा दिसून येते.
बीएसएनएलची एक ओळख म्हणजे कमी किमतीत अधिक फायदे आणि ही ओळख आजही कायम आहे. खरे म्हणजे बीएसएनएलच्या सेवा थोड्या आणखी चांगल्या झाल्या, तर बहुतेक ग्राहक बीएसएनएलमध्ये सामील होतील. तसेच
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल ची अवस्था Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या तुलनेत खूपच वाईट असली तरी बीएसएनएल ची एक विश्वासर्हता आहे.
बीएसएनएलचे वापरकर्ते ग्राहक पाच वर्षांनंतरही अद्याप 4Gच्या प्रतीक्षेत आहेत, कंपनीची 3G सेवा सर्व मंडळांमध्ये आहेत, जिथे ग्राहकांना चांगली सेवा मिळत आहे. बीएसएनएल कडे असा प्री-पेड प्लॅन असून तो Jio One प्लॅनशी स्पर्धा करत आहे. आता बीएसएनएलच्या या खास प्लॅनबद्दल जाणून घेऊ या…
आपण सर्वप्रथम, जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बघू या. जिओच्या या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रतिदिन १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण ८४ दिवस डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळेल.
आता आपल्याला बीएसएनएल च्या त्याच किंमतीच्या म्हणजेच ४९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती आहे. बीएसएनएल च्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो आणि या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. या प्लॅनसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देखील जिओ प्रमाणे दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. आता एकूणच, बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक महिन्याच्या वैधतेसह दररोज अधिक डेटा मिळत आहे.