पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – देशातील सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने खासगी क्षेत्रातील मोबाईल सेवा देणाऱ्या एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओशी स्पर्धा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहक पुन्हा एकदा बीएसएनएलकडे वळण्याची शक्यता आहे बीएसएनएलने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी BSNL ने 197 रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये मोबाईल ग्राहकांना 150 दिवसांची वैधता आणि 2GB डेटा मिळेल. BSNL च्या या प्लानबद्दल जाणून घेऊ या…
भारत संचार निगम लिमिटेडच्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये, मोबाइल ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, 2GB डेटा दररोज आणि 150 दिवसांसाठी मोफत एसएमएस सुविधा मिळेल. BSNL कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 150 दिवसांची वैधता मिळेल तसेच 2GB डेटा देखील 18 दिवसांसाठी मिळेल. जे नंतर 40kbps च्या वेगाने उपलब्ध होईल. यात आउटगोइंग कॉल 18 दिवसांसाठी मोफत राहतील. तसेच BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला 150 दिवसांची वैधता मिळेल. ज्यामध्ये ग्राहकाला 150 दिवसांसाठी इनकमिंग कॉलची सुविधा मिळेल. त्याचवेळी, 18 दिवसांनंतर, मोबाइल ग्राहकाला आउटगोइंग कॉलसाठी टॉप-अपवरून रिचार्ज करावे लागेल. याचा सरळ अर्थ, ग्राहकाला 18 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा आणि 18 दिवस अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल.