इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपले काही प्रीपेड प्लॅन अतिशय शांतपणे महाग केले आहेत. ३२० रुपयांपेक्षा कमी किंमतीतचे प्लॅन आता महागडे झाले आहेत. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलने किंमत न वाढवता प्लॅनची वैधता कमी केली आहे. वैधता कमी केल्यामुळे, प्लॅनचे दैनिक वापर शुल्क ६५ पैशांवरून थेट १ रुपये ६० पैसे एवढे झाले आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएलचे प्लॅन अप्रत्यक्षपणे आधीच महाग झाल्याचे बोलले जात आहे. कंपनीने ज्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत ते ९९ रुपये, ११८ रुपये आणि ३१९ रुपये असे आहेत.
९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी सुरुवातीला २२ दिवसांची वैधता देत असे. आता त्यात बदल झाला आहे. तुम्ही आता या प्लॅनची सदस्यता घेतल्यास, तुम्हाला २२ दिवसांऐवजी केवळ १८ दिवसांचीच वैधता मिळेल. दिलासा देणारी बाब म्हणजे यामध्ये कंपनी पूर्वीप्रमाणेच अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देत आहे.
बीएसएनएलच्या ११८ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तो आता २६ दिवसांऐवजी फक्त २० दिवस चालेल. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज ०.५ GB डेटा देत आहे. प्लॅनचे सदस्य देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये पूर्वीप्रमाणे मोफत एसएमएसचा लाभ मिळणार नाही.
३१९ रुपयांच्या प्लॅनचीही वैधता कमी करण्यात आली आहे. हा प्लॅन सुरुवातीला ७५ दिवस चालत होता. पण आता तो फक्त ६५ दिवस चालणार आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, ३०० SMS आणि १० GB डेटा मिळेल.
BSNL Mobile Prepaid Recharge Plans Very Costly See details