इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नवीन फायबर ब्रॉडबँड योजना सादर केली. या फायबर ब्रॉडबँड योजनेची किंमत २७५ रुपये आहे जी १ महिन्याच्या वैधतेसह येते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ६० Mbps स्पीडवर ३३००GB (3.3TB) पर्यंत डेटा एक्सेस मिळतो. डेटा कोटा म्हणजेच फेअर यूसेज पॉलिसी (FUP) मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड २Mbps पर्यंत घसरतो.
ही एक अतिशय परवडणारी ऑफर आहे. आणि BSNL सेवा वापरून पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक उत्तम ऑफर आहे. ही एक प्रमोशनल योजना असल्याने, ती मर्यादित काळासाठी आली. आता BSNL ने या ऑफरची एक्सपायरी डेट उघड केली आहे. ही योजना कधी संपेल ते स्पष्ट झाले आहे.
BSNL चा 275 रुपयांचा फायबर ब्रॉडबँड प्लॅन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही पर्याय ७५ दिवसांच्या वैधतेसह येतात आणि ३.३TB डेटा आणि एक निश्चित लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन ऑफर करतात. महिन्याचा FUP डेटा संपल्यानंतर, वेग २ Mbps पर्यंत कमी केला जातो. दोन ऑफरमधील फरक असा आहे की एक रु. २७५ प्लॅन ३० Mbps स्पीड ऑफर करतो आणि दुसरा ६० Mbps स्पीड ऑफर करतो.
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, २७५ रुपयांचे हे दोन्ही प्लान १३ ऑक्टोबर रोजी बंद होतील. याचा अर्थ जे ग्राहक १३ ऑक्टोबरनंतर प्लॅनसह रिचार्ज करू इच्छितात त्यांना हा प्लॅन मिळणार नाही. हा प्लॅन नवीन ग्राहकांसाठी तसेच विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. BSNL ची २७५ रुपये फायबर ब्रॉडबँड योजना BSNL च्या फायबर एंट्री प्लॅनपेक्षा अधिक परवडणारी आहे, ज्याची किंमत प्रति महिना ३२९ रुपये आहे आणि १TB डेटा आहे.
BSNL Cheapest Plan Will be Closed Soon
Fiber Broadband Internet