मुंबई – खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएल या सरकारी कंपनीने देखील आता आपल्या विविध योजनांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बीएसएनएलने आपल्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांच्या फायद्यांमध्ये मोठा बदल केला आहे. हा बदल सर्व दूरसंचार मंडळांच्या बीएसएनएल ग्राहकांसाठी करण्यात आला आहे. बीएसएनएलने बदललेले प्रीपेड प्लॅन हे 1999 आणि 2399 रुपयाचे वार्षिक प्लॅन आहेत. कंपनीने आपल्या प्लॅनची वैधता आणि उपलब्ध मोफत मध्ये बदल केले आहेत. टेलिकॉमटॉकने दिलेल्या अहवालात याची माहिती दिलेली आहे.
2399 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलने आपल्या 2399 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लानची वैधता 60 दिवसांनी वाढवली आहे. म्हणजेच, आता या प्लॅनवर एकूण 425 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. यापूर्वी यावर 365 दिवसांची वैधता उपलब्ध होती. ही ऑफर 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत वैध आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. तसेच दिवसभरात 3GB डेटा संपल्यानंतर 80Kbps च्या स्पीडवर अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.
1999 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलने आपल्या 1999 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्येही बदल केले आहेत. याची वैधता 365 दिवस आहे. यापूर्वी प्लॅनमध्ये 500 जीबी नियमित डेटा आणि 100 जीबी अतिरिक्त डेटा प्रमोशनल ऑफर अंतर्गत उपलब्ध होता. आता प्लॅनमध्ये 600GB नियमित डेटा उपलब्ध होईल. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर, 80Kbps च्या स्पीडवर अमर्यादित डेटा उपलब्ध होत राहील. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगचा लाभ कोणत्याही नेटवर्कवर उपलब्ध आहे. तसेच, दररोज 100SMS पाठवण्याची सोय आहे.