मुंबई – सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने (बीएसएनएल) ग्राहकांसाठी वैधतेच्या ऑफरसाठी आपल्या प्रीपेड योजनांमध्ये बदल केला आहे. तसेच मोबाईल वापरकर्त्यांसाठी सवलतीच्या योजना आणली आहे. सदर योजना केवळ विशेष कालावधीसाठी देण्यात येत असून यात कालबाह्य झालेले प्रीपेड नंबर किंवा कोणताही प्लॉन न वापरणाऱ्या निष्क्रिय ग्राहकांसाठी या सेवा सक्रिय करता येऊ शकतात आणि पुन्हा बीएसएनएल सेवा वापरू शकतात. या सवलतीच्या ऑफर सक्रिय करण्यासाठी मोबाईल वापरकर्ते त्यांचा तोच नंबर पुन्हा रिचार्ज करू शकतात. याची किंमत 139 रुपये, 201 रुपये आणि 1199 रुपये आहे.
1) बीएसएनएल 201 रुपयांचा प्रीपेड प्लान : ही प्रीपेड योजना राजस्थान सर्कलमधील ग्राहकांसाठी बियॉन्ड ग्रेस पीरियड मध्ये येते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर 300 मिनिटांचा मोफत व्हॉईस कॉल, एकूण 6GB डेटा आणि एकूण 99 दिवसांच्या संपूर्ण वैधता कालावधीसाठी एकूण 99 मोफत एसएमएस संदेश दिले जातात.
2) बीएसएनएल 187 रुपयांची एसटीव्ही योजना : बीएसएनएलच्या एसटीव्ही योजनेची किंमत 187 रुपये आहे. मात्र हा प्लॅन पात्र वापरकर्त्यांसाठी 139 रुपयांमध्ये उपलब्ध असेल आणि 2 जीबी दररोज हाय-स्पीड डेटा, 100 डेली कॉम्प्लिमेंटरी एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग फायदे ऑफर करत आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो.
3) बीएसएनएल 1199 रुपयांच्या सवलतीत 1,499 रुपयांचे विशेष टॅरिफ व्हाउचर देखील ऑफर करत आहे आणि ग्राहकांना 365 दिवसांची वैधता देईल. प्लान संपूर्ण वैधता कालावधीसाठी एकूण 24GB डेटासह अमर्यादित कॉलिंग बेनिफिट्स आणि 100 दैनंदिन मानाच्या एसएमएससह येतो.
4) काही प्रीपेड योजनांची वैधता केली कमी : बीएसएनएल आपल्या योजनांसह अधिक प्रमाणात वैधता देण्यास ओळखली जात होती. मात्र त्यांनी आता त्याच्या काही प्रीपेड योजनांची वैधता कमी केली आहे. बीएसएनएलने 49, 75, 94 रुपये आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचरची वैधता कमी केली आहे. आता 106, 107, 197 आणि 397 रुपयांचे प्लान व्हाउचर येत आहेत.
सदर बदल दि. 1 ऑगस्ट रोजी, खाजगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि व्हीआय ने त्यांच्या काही प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांसाठी दर वाढवले. गेल्या महिन्यात एअरटेलने 49 रुपयांचा एंट्री-लेव्हल प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केला. कंपनीचे प्रीपेड पॅक आता 79 रुपयांच्या स्मार्ट रिचार्जसह सुरू होतील.