इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सीबीआय न्यायालयाने भरतपूर राजस्थान येथील बीएसएनएलच्या माजी दूरसंचार जिल्हा व्यवस्थापकाला लाचखोरी प्रकरणात ४ वर्षांची शिक्षा सुनावली
आहे. जयपूर येथील सीबीआय प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाने ९ जुलै रोजी तत्कालीन दूरसंचार जिल्हा व्यवस्थापक राजेश कुमार बन्सल आणि राजस्थानमधील भरतपूर येथील बीएसएनएलचे कनिष्ठ लेखा अधिकारी (निवृत्त) एम.एल. बन्सल यांना लाचखोरीच्या प्रकरणात दोषी ठरवून ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही ठोठावला.
सीबीआयने ६ एप्रिल २०१७ रोजी आरोपी राजेश कुमार बन्सल यांनी एका निविदा कामाशी संबंधित प्रलंबित बिलासाठी ६० लाख रुपये (अंदाजे) देय देण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून हा खटला दाखल केला होता.
सीबीआयने सापळा रचला आणि एम. एल. बन्सल यांच्यासह तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच घेताना राजेश कुमार बन्सल यांना रंगेहाथ पकडले. सीबीआय पथकाने आरोपी राजेश कुमार बन्सल यांच्या ताब्यातून लाचेची रक्कम जप्त केली. तपासानंतर, सीबीआयने २२ सप्टेंबर २०१७ रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आरोपींविरुद्धच्या आरोपांमध्ये तथ्य आढळले आणि त्यानुसार त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.