मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण, खासगी टेलिकॉम कंपन्या 4G सेवा देत असताना बीएसएनएल ग्राहकांना मात्र, 2G आणि 3G सेवेवरच समाधान मानावे लागत आहे. मात्र, आता बीएसएनएलनेही निश्चय केला आहे. तो म्हणजे 4G आणि 5G सेवा देण्याचा. खास म्हणजे त्याचा मुहुर्तही ठरला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी देशभरात 4G आणि 5G नेटवर्क सेवा नॉन स्टँड अलोन (एनएएस) मोडवर सादर करण्याची योजना आखत आहे. यामध्ये विना एंड-टू-एंड 5G सेवा नेटवर्क ते 5G सेवा नेटवर्क सेवा दिली जाणार आहे. प्राथमिक याचा वापर ऑपरेटर्सद्वारे प्राथमिक टप्प्यात केला जातो, त्यामध्ये 4G पायाभूत सुविधांमधून 5G सेवा प्रदान करतात.
टेलिमॅटिक्सचे विकास केंद्र (सी-सी-चे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष राजकुमार उपाध्याय यांनी नुकतीच एका औद्योगिक कार्यक्रमादरम्यान ही माहिती शेअर केली. ते म्हणाले, की राज्यांचे मालकी हक्क असलेली दूरसंचार सेवा एकत्रित 5G वर काम करताना 4G साठी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (पीओसी) करत आहे.
खासगी दूरसंचार कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या 4G नेटवर्कचे अनावरण केले आहे. परंतु आर्थिक आव्हानांचा सामना करत असल्याने बीएसएनएलचे काम अडकले होते. बीएसएनएलचे 4G नेटवर्क आता पूर्ण झाले आहे. कंपनीचा व्यावसायिक करार होताच ते सादर केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तथापि, बीएसएनएल २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत आपले ५जी एसए कनेक्शन तैनात करणार आहे. बीएसएनएलने उत्तर भारतात अंबाला आणि चंडीगढमध्ये जागेचे परीक्षण करण्यासाठी आयटी सेवा आणि सल्लागार कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत भागीदारी केली आहे. राज्याकडून संचालन करण्यात येणाऱ्या दूरसंचार कंन्सल्टेंट्स इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) ने कोर नेटवर्कसारख्या इतर स्वदेशी उत्पादन असलेल्या सी-डॉट सोबत भागीदारी केली आहे.
सरकारी मालकीची संशोधन संस्था सी-डॉट, भारतीय तंत्रज्ञान संस्था या सारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांसोबत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. बीएसएनएल २०२२ मध्ये आपल्या सेवांचे अनावरण करण्यासाठी त्याच भारतीय ४ जी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. तसेच स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्टअपच्या वापराला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.