मुंबई – सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या युझर्सला गणराज्य दिनाला एका नव्या प्लॅनच्या निमित्ताने जबरदस्त गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जुन्या दोन प्लॅनची व्हॅलिडीटीही वाढविण्यात येणार आहे. कंपनीने ज्या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये बदल केला आहे त्यात २ हजार ३९९ रुपये आणि १ हजार ९९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. त्याचवेळी नव्या प्लॅनमध्ये युझर्सला अनलिमिटेड डेटासोबतच अनेक लाभ आणि सुविधाही देण्यात येणार आहेत.
३९८ रुपयांचा STV प्लॅन बीएसएनएलने लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये युझर्स अनलिमिटेड डेटाचा लाभ घेऊ शकतात. अर्थात युझर्स आपल्या सुविधेनुसार पाहिजे तेवढा डेटा वापरू शकणार आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा दिली जाणार आहे. शिवाय दररोज शंभर एसएमएस फ्री असतील.
जुन्या प्लॅनमध्ये बदल
बीएसएनएलच्या जुन्या १ हजार ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते आणि कंपनीने गणराज्य दिनाच्या निमित्ताने या प्लॅनची व्हॅलिडीटी २१ दिवसांनी वाढविली आहे. त्यामुळे आता हा प्लॅन एकूण ३८६ दिवसांचा झाला आहे. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हा प्लॅन रिचार्ज करणाऱ्यांना ३८६ दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असेल. याशिवाय दररोज शंभर एसएमएसची सुविधा आहेच.
त्याचप्रमाणे २ हजार ३९९ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी ७२ दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा प्लॅन आता ४३७ दिवसांचा झाला आहे. पूर्वी हा प्लॅन केवळ ३६५ दिवसांचा होता. या प्लॅनवर मिळणारी व्हॅलिडीटीची ऑफर ३१ मार्च २०२१ पर्यंतच असेल. अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मोफत एसएमएसची सुविधा यातही आहे.