नवी दिल्ली – बीएसएनएलने आता ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत. हे प्लॅन्स सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. जे पहिल्यांदाच रिचार्ज करणार आहेत, अशांसाठी हे प्लॅन अत्यंत उपयुक्त आहेत.
यातील २४९ रुपयांचा प्लॅन हा फर्स्ट रिचार्ज कूपन अंतर्गत लाँच करण्यात आला होता. गेल्या महिन्यात काही काळासाठी म्हणून हा प्लॅन आणण्यात आला होता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, दररोज १ जीबी डेटा, देण्यात येणार आहे. याशिवाय, युझर्सना दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ६० दिवसांची आहे.
या २४९ रुपयांच्या प्लॅनसोबत बीएसएनएलने २९८ रुपयांचा प्लॅनही आणला आहे. यातही त्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळणार आहेत. मात्र, या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये इरॉस नाऊ (Eros Now) चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ही सुविधा २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये नाही.
ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देऊन बीएसएनएलही आता या स्पर्धेत उतरले आहे. बीएसएनएलशिवाय एअरटेल, जिओ हे देखील या स्पर्धेत असून ते यात आघाडीवर आहेत.
२४९ रुपयांचे अन्य कंपन्यांचे प्लॅन्स काय देतात?
रिलायन्स जिओच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. तेवढ्या दिवसात ५६ जीबी डेटा आपल्याला मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस या सुविधा आहेतच. व्होडाफोन आयडिया (Vi) च्या प्लॅनमध्ये दिवसाला दीड जीबी डेटा दिला जातो. याची वैधता २८ दिवसांची आहे. वीकेंड डेटा रोलओव्हर होण्याची सोय, Vi मुव्ही आणि टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन यात दिले जाते.