नवी दिल्ली – सरकारी कंपनी भारतीय संचार निगम अर्थात बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत स्वस्त प्रीपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅन अंतर्गत युझर्सना कमी किमतीत बराच डेटा वापरायला मिळणार आहे. या प्लॅनची किंमत ४७ रुपये असून एफआरसी म्हणजे फर्स्ट रिचार्ज प्लॅन अंतर्गत हा प्लॅन आहे. त्यामुळे याचा फायदा काही मोजक्याच ग्राहकांना मिळणार आहे.
कोणाला मिळणार फायदा?
बीएसएनएलचे जे नवीन युझर्स आहेत, त्यांनाच या प्लॅनचा फायदा मिळेल. जर तुम्ही पहिल्यांदाच बीएसएनएलचे रिचार्ज करत असाल तर तुम्ही याचा फायदा निश्चितच घेऊ शकता. हा कंपनीचा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे.
या प्लॅनची व्हॅलीडिटी २८ दिवसांची असून १४ जीबी डेटा देखील युझर्सना मिळणार आहे. एवढेच नाही, तर या प्लॅन अंतर्गत रोमिंग दरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. याशिवाय रोजचे १०० एसएमएस देखील मिळणार आहेत. टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार, ४७ रुपयांचा हा प्लॅन काही सर्कलमध्येच उपलब्ध आहे. ३१ मार्च पर्यंत प्रमोशनल ऑफर म्हणून हा प्लॅन मिळणार आहे. लवकरच अन्य सर्कलमध्ये हा प्लॅन आणला जाईल, अशी अपेक्षा आहे.