नवी दिल्ली – मोबाइल प्लॅनच्या रिचार्जच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलने एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन आणला आहे. ३६५ रुपयांच्या या प्लॅनमध्ये वर्षभराची वैधता आहे. म्हणजेच, दिवसाला एक रुपया असा खर्च येणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधाही आहे.
कॉम्बो रिचार्ज पॅकसोबत हा पॅक मिळेल. याअंतर्गत सुरुवातीच्या ६० दिवसांसाठी २५० मिनिटे फ्री मिळतील. यात दिल्ली, मुंबईसाठी लोकल तसेच एसटीडी, नॅशनल रोमिंग कॉलचा समावेश आहे. ही २५० मिनिटे संपल्यावर युझर्सच्या बेस प्लॅननुसार त्यांना किंमत आकारली जाईल. या प्लॅनमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यास इंटरनेटचा स्पीड कमी होईल.
बीएसएनएलचा हा प्लॅन काही ठरावीक सर्कलमध्येच उपलब्ध आहे. यात आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, छत्तीसगड, ओडिशा, पंजाब, राजस्थान आदींचा समावेश आहे.