विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या काळात मोबाईल हा जणू काही आवश्यक घटक बनला असून इतकेच नव्हे तर मूलभूत गरज झाली आहे. त्यामुळे मोबाईलधारक ग्राहकांसाठी विविध टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या योजना आणत असतात. सध्या या टेलॉकॉम कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्याकरिता भारत दूरसंचार निगम लिमिटेडने देखील वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. त्यातच वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल या कंपन्याच्या योजनांशी स्पर्धा म्हणून सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएलने नवीन प्लॅन सुरू केला आहे. वर्षभराची हो फायदेशीर योजना असून यात भरपूर डेटा, अमर्यादित कॉलिंगचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे.
बीएसएनएलच्या या प्लॅनची किंमत १४९८ रुपयांचा असून नवीन प्रीपेड डेटा प्लॅन हा मोबाईल वापरकर्त्यांना वर्षभर इंटरनेट आणि अमर्यादित कॉलची सुविधा देतो. विशेष म्हणजे ही योजना याच महिन्यात २३ ऑगस्टपासून सर्वत्र उपलब्ध झाली आहे. कोरोना काळामुळे सध्या काही ‘वर्क फॉर्म होम ‘ म्हणजे लोक घरून काम करत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे.
या प्लॅनमध्ये हे आहे फायदे :
ग्राहकांना दररोज २ जीबी (2GB ) डेटा दिला जातो. तसेच हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड कमी केली जाते. या प्लॅनची वैधता ही एक वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची आहे. तसेच यात अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.