शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये भारतातील दुसरी BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा; बघा लोकार्पण सोहळा LIVE

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2022 | 11:34 am
in स्थानिक बातम्या
0
FL2xb9CaMAAhxnM

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोव्हीड सारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) च्या वतीने BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. जवळपास 25 कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.भारतीताई प्रवीण पवार यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.  महाकवी कालिदास कला मंदिरात हा समारंभ सध्या होत आहे.
या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना.मनसुखभाई मांडवीया यांनी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) ही आरोग्य सेवेतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीची देशातील सर्वात मोठी योजना तयार केली आहे. या मिशनच्या वतीने BSL-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. सदरील व्हॅनचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या शुभ हस्ते होत आहे. यावेळी DHR आणि ICMR चे महासंचालक प्रा. डॉ. बलराम भार्गव, DHR, सहसचिव श्रीमती अनु नगर ICMR-NIV चे शास्त्रज्ञ तसेच नाशिक येथील मान्यवर उपस्थित आहेत.

“जैव-सुरक्षा सज्जता आणि महामारी संशोधनाला बळकटी” देण्यासाठी देशात चार मोबाईल जैव सुरक्षा स्तर -3 (BSL-3) प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरने आहेत ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील कर्मचाऱ्यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार असून या BSL-3 प्रयोगशाळा मोठ्या आरोग्य सेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असतील. या प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टीमसह अनेक सुरक्षा खबरदारीने सुसज्ज असतील ज्यामुळे समाजाला धोका कमी होईल. ही व्हॅन उच्च जोखमीच्या संसर्गजन्य रोगाच्या उदया दरम्यान देशाच्या प्रयोगशाळेची प्रतिसाद क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देईल.

अलीकडच्या वर्षात आपल्या देशाला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागला. पश्चिम घाट प्रदेशात एव्हीयन इंफ्ल्यूएन्झा, क्यासनूर वनरोग, राजस्थान मध्ये झिका आणि केरळमध्ये निपाह विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाला होता. ही BSL-3 प्रयोगशाळा प्रादुर्भाव/ क्षेत्रतापासणी/अत्याधिक संसर्गजन्य/संभाव्यपणे प्राणघातक विषाणूंचा सर्वेक्षणाचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक आहे. जे भाग रेल्वे/रस्ते सेवेने चांगल्या पध्दतीने जोडले गेलेले नाहीत त्याभागात हे उपकरण वेळेवर आणि जलदगतीने ऑनसाईट निदान आणि अहवाल देण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही अत्याधुनिक जैव सुरक्षा प्रयोगशाळा (मोबाईल व्हॅन) उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यात प्रथमच उपलब्ध होत आहे. ना.भारतीताई प्रवीण पवार यांच्या प्रयत्नाने देशातील दुसरी व्हॅन नाशिकमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे याचा फायदा दुर्गम व आदिवासी भागातील सामान्य लोकांना होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडात समोर आला हा नवा खुलासा

Next Post

काँग्रेस आमदारांचा चक्क विधानसभेतच रात्री मुक्काम; हे आहे कारण (बघा व्हिडिओ)

Next Post
FL0OiPvaQAEV4p7

काँग्रेस आमदारांचा चक्क विधानसभेतच रात्री मुक्काम; हे आहे कारण (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011