मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजार वर जाऊनही गुंतवणुकदारांचे नुकसान होण्याचा आश्चर्यकारक प्रकार सोमवारी घडला. रिलायन्सचे शेअर वर जाऊन मार्केट स्थिरावले. परंतु, गुंतवणुकदारांचे तब्बल १५,००० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढले आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीदेखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे. आपापल्या ऐपतीनुसार रोजचे ट्रेडिंग करणारेदेखील बरेच आहेत. अशातच सोमवारी झालेल्या प्रकाराने पैसा लावणाऱ्यांना चांगलाच झटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीमुळे, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक जुलै रोजी किंचित वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये ६३.७२ अंकांची वाढ होऊ तो ६५,३४४.१७ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २४.१० अंकांच्या वाढीसह १९,३५५.९० वर बंद झाला. मात्र, ब्रॉडर मार्केटमध्ये घसरण दिसून आली.
बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.४६ टक्क्यांनी घसरून बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२६ टक्क्यांनी घसरला. कामकाजादरम्यान सर्वात मोठी घसरण आयटी, युटिलिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, पॉवर आणि रियल्टीच्या शेअर्समध्ये दिसून आली. मात्र, दुसरीकडे मेटल आणि एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचा दिसून येत होती. या अस्थिर परिस्थितीत आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे १५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप १० जुलै रोजी २९९.६३ लाख कोटी रुपयांवर घसरलं. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी ७ जुलै रोजी ते २९९.७८ लाख कोटी रुपये होते. अशाप्रकार बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कैप आज सुमारे १५ हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुस शब्दांत सांगायचे झाले तर आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १५,००० कोटी रुपयांची घट झाली आहे.
यात आहे तेजी
शेअर मार्केटमधील घसरणीदरम्यान सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ९ शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्येही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने सर्वाधिक ३.७८ टक्क्यांची वाढ नोंदवली. यानंतर टाटा स्टील, भारती एअरटेल, फार्मा आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.