मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या सोशल मिडियावर ट्रेडिंगच्या बाबतीत किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणीकीच्या बाबतीत सल्ला देणारे लाख लोक जन्माला आले आहेत. त्यातील काहींचे ऐकून आपण आपल्या गुंतवणुकीची दिशा ठरवतो. मात्र सेबीने एका प्रसिद्ध व्यक्तीवर कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना सतर्क केले आहे.
सोशल मिडियावर प्रत्येक दोन रिल्सनंतर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा सल्ला देणारे अवतरतात. पण, या सर्वांची विश्वासार्हता न तपासताच लोक गुंतवणुक करतात. याशिवाय बाजार नियामक सेबीकडे बहुतांश लोकांनी नोंदच केलेली नसते. अश्याच एका सोशल मिडियावर सल्ले देणाऱ्यावर सेबीने जबर कारवाई केली आहे.
पीआर सुंदर असे त्याचे नाव असून सोशल मिडियावर त्याने धुमाकूळ घातला होता. त्याने दिलेले सल्ले लोकांच्या किती कामी आले किंवा नाही हे तर लोकांनाच माहिती, पण त्याची सेबीमध्ये नोंदणी नसल्याने कारवाई मात्र जबरदस्त झालेली आहे सेबीने मार्केटचे काही नियम आणि भूमिका ठरविलेले आहेत. या नियमांनुसार न चालणारे किंवा नियम मोडणाऱ्यांवर यापुढे अशीच कारवाई होत राहील, असेही सेबीने स्पष्ट केले आहे. पीआर सुंदर लोकप्रिय ट्रेडर असल्यामुळे त्याला फॉलो करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
सेबीसोबत करार
पीआर सुंदर यांची कंपनी मनसुन कन्सल्टिंग आणि मंगयारकरसी सुंदर यांनी सेबीसोबत करार केला आहे. या तिघांच्याही विरोधात सेबीकडे तक्रार करण्यात आली होती की, सेबीकडे नोंदणी न करताच ते गुंतवणुकीच्या संदर्भात सल्ले देतात.
काय म्हणतो करार
करारानुसार, तिघांनीही सेटलमेंट अॉर्डर पास होण्याच्या तारखेपासून पुढील एक वर्ष शेअर्सची खरेदी, विक्री किंवा किंवा इतरांच्या डिल्सपासून लांब राहण्यावर सहमती दर्शवली आहे. यासोबतच त्यांनी ६ कोटी रुपये तसेच गुंतवणुकीच्या सल्ल्यातून कमावलेला नफा व्याजासह परत करण्याचीही कबुली दिली आहे.
BSE Share Market Sebi Action Stock Trading