इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजार हा एक प्रकारे जुगार मानला जात असला तरी त्यामध्ये लाखो नागरिक हे गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करताना दिसतात. विशेष म्हणजे ही गुंतवणूक हजार रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंत असू शकते. शेअर बाजारांमध्ये काहीवेळा नुकसान होत असले, तरी अनेक वेळा फायदा देखील होतो. आणि हा फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. असा अनेकांचा अनुभव आहे. सध्या एका कंपनीच्या शेअर बाबत देखील असाच अनुभव येत असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दीपक नाइट्राइट या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 10 वर्षांपूर्वी 20 रुपये देखील नव्हती, परंतु आज या स्टॉकची किंमत 25,00 रुपयांच्या वर आहे. गेल्या एका वर्षात या समभागात आणखी मजबूत वाढ झाली आहे. हा स्टॉक NSE वर दि. 11 जानेवारी 2021 रोजी 1,028.15 रुपयांवर बंद झाला आणि आज 10 जानेवारी 2022 रोजी या स्टॉकची किंमत 2,592 रुपयांपेक्षा जास्त होती. या समभागाने एका वर्षात 152 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या सहा महिन्यांत या समभागात 32.78 टक्के वाढ झाली आहे. त्यातच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने देखील या स्टॉकमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे.
एक्सचेंज फाइलिंगनुसार, LIC ने कंपनीतील अंदाजे 46,01,327 रुपयांपेक्षा समभागांसह 3.37 टक्क्यांपर्यंत आपला हिस्सा वाढवला आहे. LIC कडे सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस दीपक नायट्रेटमध्ये 1.68 टक्क्यांचा हिस्सा होता. दीपक नायट्रेटच्या समभागांनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 17,005.96 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत दीपक नायट्रेटच्या समभागांनी सुमारे 153 वेळा उसळी घेतली आहे. त्यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते आजपर्यंत गुंतवणूक करत राहिले असते, तर आज ही रक्कम 1 कोटी 71 लाखांपेक्षा जास्त झाली असती, असे दिसून येते.