इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुटुंबात असो की समाजात नात्यांना फार महत्त्वाचे स्थान असते, आई आणि मुलगा, बहिण – भाऊ असो भाऊ -भाऊ, बहिणी बहिणी तसेच मित्र-मित्र अशी अनेक नाते ही प्रेमाची प्रतिक मानले जातात. या नात्यांवरच जीवनाचे अनेक मानसिक भावनिक आधार अवलंबून असतात ,ही नाती तुटली तर मनुष्य कोलमडून जातो त्यातच बहिण भावाचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते, चित्रपटांमधून देखील या संदर्भात अनेक गाणी आणि कथा प्रसिद्ध आहेत. राजस्थान मधील जयपूर मध्ये देखील अशाच बहीण भावाच्या अतूट नात्याची एक वेगळीच कहाणी समोर आली आहे. आपल्या बहिणीचा विरह भाऊ सहन करू शकला नाही आणि त्याने चक्क बहिणीच्या भडकलेल्या चित्तेत उडी घेतली, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्मशानात एकच गोंधळ उडाला
राजस्थानमधील भिलवाडा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अंत्यसंस्कारावेळी हा प्रकार घडल्याने अत्यंविधीसाठी उपस्थित असलेले सगळेच गोंधळून गेले. जळत्या चितेत उडी घेतल्याने हा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. मीना भिल ही महिला मृत झाल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि चितेला अग्नी देण्यात आला. यानंतर सर्वजण थोडे दूर जाऊन बसले. यावेळी मीना यांचा भाऊ सुखदेव भिल याने त्याच्या जळत्या चितेत उडी घेतली.
सुखदेव यांनी बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतल्याने स्मशानात एकच गोंधळ उडाला. स्मशानात अंत्यविधीसाठी जमलेल्या नातेवाईंनी सुखदेव यांना जळत्या चितेतून बाहेर काढले. सुखदेव या घटनेत गभीर रीत्या जखमी झाले आहेत. तात्काळ उपचारसाठी दाखल करण्यात आले, मात्र या घटनेत सुखदेव १०० टक्के भाजले गेले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
बहिण भावाच्या अतूट प्रेमाची प्रचिती
सुखदेव यांच्या त्यांची बहिण मीना यांच्यावर खूप जीव होता. वास्तविक सुखदेव हे मीना यांचे सख्खे नव्हे चुलत भाऊ होते. मात्र, दोघांनी एकमेकांना सख्ख्या भावंडाप्रमाणे माया लावली होती. यामुळे बहिणीच्या जाण्याचे दुख: सुखदेव यांना सहन झाले नाही. बहिणीच्या जळत्या चितेत त्यांनी उडी घेतली. बहिणीच्या मृत्यूनंतर स्वत:ला मृत्यूच्या दारात झोकून देणाऱ्या या भावाला पाहून सगळेच आवाक झाले. बहिण भावाच्या अतूट प्रेमाची प्रचिती सगळ्यांना आली. सुखदेव हे कधीच मीना यांना एकटे सोडायचे नाहीत. मृत्यूनंतरही सुखदेव यांनी मीना यांना एकटे सोडले नाही. त्यांनी मीना यांना अग्नी दिल्यावर त्यांच्या जळत्या चितेत उडी घेतली. याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
Brother Sister Love Cremation Pyre Jump