अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उझबेकिंस्थान ताश्कंद येथे संपन्न होत असलेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४० किलो वजनी गटात आकांक्षा ने ५५ किलो स्नॅच ७० किलो क्लिन जर्क असे १२५ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले १५ ते २६ जुलै दरम्यान संपन्न होत असलेल्या आशियाई युथ ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षाने भारतासाठी अजून एक कांस्यपदक पटकावून अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. मेक्सिको येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकविल्याने आशियाई युथ स्पर्धेत आकांक्षा कडून पदकाची अपेक्षा होतीच. फिलिपीन्सच्या कोलोनिया एन्जोलिंनने सरस कामगिरी करीत ६२ किलो स्नॅच ७२ किलो क्लिन जर्क एकूण १३४ किलो वजन उचलून सुवर्ण तर व्हिएतनाम च्या जुयोंग थी किम चेनने ५६ किलो स्नॅच ७३ किलो क्लिन जर्क एकूण १२९ किलो वजन उचलून रौप्य तर जय भवानी व्यायामशाळा व श्री गुरूगोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थिनी आकांक्षा व्यवहारे हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत ५५ किलो स्नॅच ७० किलो क्लिन जर्क असे १२५ किलो वजन उचलून आपल्या सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकवीत मनमाड महाराष्ट्र व भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
आकांक्षाला भारतीय संघा बरोबर ताश्कंद गेलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर व छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, गुरू गोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंग प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.