इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुख किंवा राजे, महाराजे, राणी, महाराणी यांनी आपल्या पदाचा स्वीकार केल्यानंतर शपथ घ्यावी लागते, तसेच संबंधित अत्यंत महत्त्वाच्या नोंदवहीवर स्वाक्षरी करावी लागते, ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स यांनीही शपथ घेतल्यानंतर संबंधित महत्त्वाच्या रजिस्टर व कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना ते छोट्याशा टेबलावर बसले. तेथे असलेला अन्य रजिस्टर, कागदपत्रे व ट्रे चा पसारा पाहून ते काहीसे नाराज झाले होते. किंबहुना संतापले होते, त्या क्षणाचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनानंतर राजे झालेले चार्ल्स (तिसरे) यांची फजिती झाल्याचा आणि त्यानंतर ते संतापल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सही करताना पेनमधून शाई गळाली आणि त्यानंतर त्यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अगदी अलीकडच्या दिवसांत दुसऱ्यांदा त्यांची चिडचिड कॅमेऱ्यासमोर दिसली. शनिवारी लंडनमध्ये टेबलावर पेनचे फोल्डर बघून चिडलेल्या चार्ल्स यांनी हातवारे करून सहायकाला टेबल साफ करण्यास सांगितले होते. राजेपदी घोषणा झाल्यावर राजे चार्ल्स म्हणाले, “माय लॉर्ड्स, लेडिज अँड जेंटलमेन, माझी प्रिय आई, महाराणी यांचं निधन झाल्याची घोषणा करण्याची दुःखद जबाबदारी मी पार पाडत आहे.” “तुम्ही एक राष्ट्र म्हणून आणि माझ्यामते संपूर्ण जगच यावेळेस आपल्याला कधीच न भरुन येणाऱ्य़ा दुःखात सहभागी असतील याची मला कल्पना आहे.”
“या दुःखात माझ्या भावडांकडेही अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत हे माझ्यासाठी मोठं सांत्वनच आहे. याच प्रकारची आपुलकी आणि आधार दुःखात बुडालेल्या माझ्या सर्व कुटुंबाप्रतीही मिळावा.” युनायटेड किंगडममध्ये कुठेही राहत असला किंवा जगभरात कुठेही राहत असाल, तुमची पार्श्वभूमी किंवा श्रद्धा काहीही असो, मी आयुष्यभर तुमची निष्ठा, आदर आणि प्रेमानं सेवा करण्याचा प्रयत्न करेन.
“मी माझ्या नवीन जबाबदाऱ्या हाती घेतल्यानं माझं जीवन नक्कीच बदलेल. ज्या धर्मादाय संस्था आणि समस्यांसाठी मी मनापासून काळजी घेतो त्यांना माझा इतका वेळ आणि ताकद देणं यापुढे मला यापुढे शक्य होणार नाही. पण या बाबी विश्वासार्ह लोकांच्या हाती जाईल, हे महत्त्वाचं काम मला चांगलंच ठाऊक आहे. “माझ्या कुटुंबासाठीही हा बदलाचा काळ आहे. मी माझी प्रिय पत्नी कॅमिला हिच्या प्रेमळ मदतीवर विश्वास ठेवतो. सतरा वर्षांपूर्वी आमच्या लग्नानंतर तिनेही स्वत:च्या एकनिष्ठ सार्वजनिक सेवेची ओळख म्हणून करून दिली आहे. मला माहित आहे की ती आता तिच्या नवीन भूमिकेच्या कर्तव्याप्रती अविचल बांधिलकेनं काम करेल.
राज गादीवर बसल्यानंतर राजे चार्ल्स उत्तर आयर्लंडमधील बेलफास्टजवळील हिल्सबॉरो कॅसल येथे आले होते. इथे ते व्हिजिटर्स डायरीवर स्वाक्षरी करीत होते. त्या वेळी हा प्रसंग घडला. काय म्हणाले राजे? ‘अरे देवा, हे पेन मला अजिबात नाही आवडत’, असे रागात म्हणत ते खुर्चीवरून उठले. गळके पेन त्यांनी पत्नी कॅमिला यांच्याकडे दिले. यानंतर खिशातून रुमाल काढून बोटे पुसू लागले.
दरम्यान, तो प्रकार पाहून ‘बघा ती शाई सगळीकडे पसरतेय,’ असे राणी म्हणाल्या. त्यावर, ‘अशा वाह्यात गोष्टी मी सहन करू शकत नाही’ असे राजे जोरात ओरडले आणि निघून गेले. नंतर राणीने स्वाक्षरी केली. या प्रसंगावरून असे दिसते की, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे राजपदावर असलेल्या व्यक्तीची ही किरकोळ कारणावरून चिडचिड होऊ शकते, म्हणजे व्यक्ती किती मोठीअसला तरी तिच्या भावना काही वेळा अनावर होतात.
"I can't bear this bloody thing!": King Charles' signing ceremony at Northern Ireland's Hillsborough Castle made one thing clear – even royalty can't escape the frustration of an inadequate pen. pic.twitter.com/nzygNTLslX
— CBS News (@CBSNews) September 13, 2022
Britain New King Charles Video Viral
Signs