काबूल – अफगाणिस्तानमधून ब्रिटनने गेल्या दोन आठवड्यात जवळपास १५ हजार ब्रिटन आणि अफगाण नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे, अशी घोषणा ब्रिटेनने केली आहे. ब्रिटनची मोहीम पूर्ण झाली असून, त्यांचे सैनिक माघारी परतले आहेत. या मोहिमेत ब्रिटनने एक हजार सैनिक, राजदूत आणि नागरिकांसोबत काम केले आहे. अफगाणिस्तानातील ब्रिटनचे राजदूत लॉरी ब्रिस्टो शनिवारी म्हणाले, की ऑपरेशन पिटिंग सुरू झाल्यानंतर जवळपास १५ हजार ब्रिटिश नागरिक, अफगाणी कर्मचारी आणि इतर जोखीम असलेल्या नागरिकांना काबूलच्या बाहेर काढले आहे. अफगाणिस्तानातील लोकांसाठी आम्ही कायम कटिबद्ध असू. ऑपरेशच्या या टप्प्याला बंद करण्याची वेळ आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सांगतात, ब्रिटनच्या सैनिकांची शेवटची खेप माघारी येण्याचा हा एक असा क्षण आहे, जो गेल्या दोन दशकात आम्ही काय बलिदान दिले आणि काय मिळविले हे दाखवितो. ब्रिटनचे इतके सैनिक बाहेर येण्यास यशस्वी होतील याचा बिलकूल अंदाज नव्हता.
व्हाइट हाउसने शुक्रवारी सांगितले, की २६ ऑगस्टला सकाळी तीन वाजता (स्थानिक वेळेनुसार) काबूलमधून जवळपास १२,५०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ३५ अमेरिकी सैनिक विमानांच्या माध्यमातून जवळपास ८५०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सहकारी उड्डाणांच्या माध्यमातून चार हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. १४ ऑगस्टला अमेरिकेच्या एक लाख पाच हजार नागरिकांना काढण्यात आले आहे. जुलैअखेरपर्यंत जवळपास १० हजार ६०० नागरिकांना दुसर्या ठिकाणांवर पोहोचवले आहे.
काबूलमध्ये विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात मृतांमध्ये १०० हून अधिक लोकांमध्ये ब्रिटनच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये एका मुलाचाही समावेश होता, युनायटेड किंगडमचे (यूके) परराष्ट्र सचिव डोमेनिक रॉब यांनी ही माहिती दिली.