पाटणा (बिहार) – आपल्या देशात कोणत्याही जाती-धर्मामध्ये शक्यतो विवाहप्रसंगी नवरदेव हा घोड्यावर बसून मिरवणुकीने लग्नमंडपात येतो. त्यानंतर विवाह संपन्न होतो. अशीच प्रथा सर्वत्र दिसून येते. परंतु बिहारमध्ये मात्र आगळीवेगळी घटना घडली. तिथे नवरी मुलगी चक्क घोड्यावर बसून मिरवणुकीने आपल्या भावी नवऱ्याला म्हणजेच वराला घेण्यासाठी येण्यासाठी निघाली, तेव्हा वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्काच बसला.
गया शहरातील अनुष्पा गुहा हीचे लग्न पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी जीत मुखर्जी याच्या सोबत ठरले अनुष्पा ही इंडिगो एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत आहे. त्यांच्या लग्नाला भव्यदिव्य बनण्यासाठी खूप व्यवस्था करण्यात आली होती. चांदचौरा येथील सुजुर भवनातून वधू जेव्हा वराला आणण्यासाठी घोड्यावर बसून निघाली, तेव्हा सर्वत्र याचीच चर्चा रंगली होती.घोड्यावर स्वार झालेली वधू पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
नववधू अनुष्पा गुहा म्हणाली की, आजही मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. मुलींना देखील मुलांच्या बरोबरीने आणण्यासाठी अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. मुलगा-मुलगी हा भेदभाव दूर करण्यासाठी आम्ही घोड्यावर बसवून जात आहोत. तसेच इतर मुलींनाही त्यांच्या वराला आणण्यास असेच स्वतःघोडयावर जाण्यास सांगेन. मात्र बिहारमध्ये यापूर्वीही असे विवाह झाले असून वधूने लग्नासाठी वर आणल्याचे सांगण्यात येते.