इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात तरुण मुला-मुलींचे विवाह जमण्यास खूप अडचणी निर्माण होतात. याला कारण म्हणजे सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. वधू-वर एकमेकाला अनुरूप असावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यातच जात, पंथ, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण, रंग, शिक्षण अशा गोष्टी अनेक बघितल्या जातात. परंतु इतके करूनही काहीवेळा विवाह मोडतात. याला अनेक कारणे असतात. कधी मुलाकडच्या अपेक्षा जास्त असतात, तर कधी मुलीकडच्या अपेक्षा वाढतात. खरे म्हणजे आजच्या काळात कोणत्याही मुलीला जाड किंवा लठ्ठ मुलगा नको असतो. त्यामुळे बहुतांश मुली सडपातळ मुलाला नवरा म्हणून पसंत करतात. परंतु उत्तर प्रदेशात एका मुलीने नवरा बारीक आहे म्हणून लग्नास नकार दिला आणि एकच गोंधळ उडाला.
मिरवणुकीत झालेल्या खर्चाच्या परतफेडीवरून त्यांच्यात भांडण झाले. वराला ओलिस ठेवल्याच्या भीतीने लग्नाची मिरवणूक निघाली नाही. याची माहिती मिळताच पोलीस आले, वराला सोडवले. मुलीच्या बाजूने गुन्हा लिहून एकाला ताब्यात घेतले. तर दुसरीकडे मिरवणुकीत दारू पिऊन महागडी बाईक घेऊन पैसे मागितल्याचा आरोप वधू कडील मंडळी करत होती.
जैदपूर हद्दीतील गुचौरा गावात एका मुलीचे लग्न होते. बाराबंकी भागाच्या फजुल्लागंज गावातून योगेंद्र कुमार यांची मिरवणूक रात्री शत्रोहन यांच्या घरी आली. गात आणि नाचत वराकडचे सर्व वऱ्हाडी मंडळी नवरीच्या घरी पोहोचले आणि नाश्ता करू लागले. त्यानंतर लग्नाचा विधी सुरू झाला. मात्र वधूपक्षाच्या मंडळीची नजर त्या मुलावर पडली तेव्हा त्याला राग आला. दुबळ्या सडपातळ वराला पाहून वधू मुलीने वाद घालायला सुरुवात केली.
दरम्यान हा आवाज ऐकून वऱ्हाडी गावकरीही घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजू समोरासमोर येताच जोरदार गोंधळ सुरू झाला. वधूच्या आईसह इतर महिलांनी लग्नास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी वराला ओलीस ठेवले. वधू पक्षाने सांगितले की, खर्च केलेली रक्कम परत करा, मग आम्ही वराला सोडू. ग्रामस्थांची वाढती गर्दी पाहून मिरवणूक थांबली.
रात्रभर चाललेल्या गोंधळानंतर वराच्या बाजूच्या मंडळींनी सकाळी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी गावात पोहोचले. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर वराची सुटका केली. वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यात आल्यानंतरही योगेंद्र बिनशर्त लग्न करण्यास तयार होता. वराचा भाऊ ज्ञानेंद्र याच्या तक्रारीवरून पोलिसांनी वधूचे वडील आणि इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून वधूच्या भावाला ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे वधूचे वडील शत्रोहन आणि आई यांनी सांगितले की, कार आणि एक लाख रुपये न मिळाल्याने वराने लग्नास नकार दिला आणि लग्नाचे सर्व सामान फेकून दिले. वऱ्हाडींनी दारूच्या नशेत गोंधळ घातला आणि मुलीच्या बाजूच्या लोकांना मारहाण आणि अश्लील चाळे करण्याचा त्यांचा हेतू होता, असा आरोप मुलीच्या बाजूने केला आहे. या घटनेची पोलिसातही नोंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूने तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून तपास केला जात आहे.