नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वात जागतिक हिताच्या दृष्टीने धोरणात्मक सहकाऱ्याकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
डॉ. पवार म्हणाल्या की, भारताचे पंतप्रधानांच्या गतिशील नेतृत्वात जागतिक हिताच्या दृष्टीने धोरणात्मक सहकाऱ्याकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असून कोविड आणि नॉन कोविड तथा रोगनिदान, लस, औषध निर्माण इत्यादींमध्ये नवकल्पनांना गती देऊन आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधा अधिक चांगल्या करून जगाला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्यासाठी तसेच आरोग्य दृष्टीकोनावर भर देऊन साथींच्या रोगाविरोधात एकत्र येऊन काम करण्याचे सर्व ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांना आवाहन केले.
या प्रसंगी मा.श्री.मनसुख मांडवीया,(भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री), मा.श्री.सर्वानंद सोनोवाल, (आयुष मंत्री, भारत सरकार), महामहिम डॉ.मा.शाओवे, (मंत्री, राष्ट्रीय आरोग्य आयोग, चीन), महामहिम डॉ.जो फाहला (आरोग्य उपमंत्री, दक्षिण आफ्रिका), महामहिम श्री. मार्सेलो क्विरोगा (आरोग्य मंत्री, ब्राझील), महामहिम श्री.मिखाईल मुराश्को (आरोग्य मंत्री, रशिया), महामहिम डॉ.टेड्रोस अदनोम (महासंचालक, डब्ल्यूएचओ) तसेच सन्मानित सदस्य, इतर अधिकारी भारत सरकारचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.