इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही सस्तन प्राण्यांच्या पिल्लासाठी आईचे दूध हाच सर्वात उत्तम आहार असतो. मानव प्राण्यात तर आईच्या दुधा शिवाय बाळ राहूच शकत नाही, कारण दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार व रोग प्रतिबंधक घटक असतात, म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. मात्र इटलीतील संशोधकांनी आईच्या दुधात मायक्रो प्लास्टिक शोधले असून याचा बाळाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असे संशोधन अहवाल सादर केला आहे.
खरे म्हणजे आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. आईच्या दुधाचा मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते.आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात आता
इटलीतील एका संशोधकांच्या पथकाने आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक शोधले आहेत. यासोबतच या दुधाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. सदर संशोधन करताना शास्त्रज्ञांनी, एका स्तनदा मातेच्या अनेक चाचण्या घेतल्या. या महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळल्याचे शास्त्रज्ञांच्या संशोधना दरम्यान निष्पन्न झाले असून या संदर्भात पर्यावरण तज्ज्ञ आणि प्रदूषण अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आर्क्टिक प्लॅस्टिक बर्फ, युनायटेड स्टेट्समधील प्लास्टिकचा पाऊस, जागतिक दरडोई दर आठवड्याला सुमारे १० प्लास्टिकचे कण पोटात जातात, लहान मुलांच्या विष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रो प्लास्टिक्स आणि प्लास्टिक आढळले आहेत.
संशोधन संशोधकाच्या संशोधनाच्या नवीन एका नवीन अहवालानुसार गर्भवती मातेच्या उदरातील बाळाच्या नाळेचे असे सूक्ष्म कण आढळल्याचे सांगण्यात येते. अलिकडच्या वर्षांत, वैज्ञानिक समुदायाच्या “मायक्रोप्लास्टिक कणांवरील” संशोधनामुळे मानवाच्या अस्तित्वाच्या सद्य परिस्थितीची जाणीव सतत होत आहे. सध्या चीनसह जगभरातील ७० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांनी ‘प्लास्टिक बंदी’ जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी केली आहे. तसेच जगात दरवर्षी जवळजवळ ३० कोटी टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो.
जगामध्ये दर मिनिटाला २० लाख एकल वापराच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे वाटप केले जाते.
भारतात यंदा दि. १ जुलैपासून या एकल वापर प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तुंच्या वापरावर बंदी घातली गेली आहे. यामध्ये १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणाऱ्या प्लास्टिकपासून तयार केल्या जाणाऱ्या बॅनर्सचाही समावेश आहे. यात फुगे, प्लास्टिकच्या काड्या, मिठाईच्या बॉक्सवरील प्लॉस्टिक यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. इतकच नाही तर केंद्र सरकारने १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरही ३१ डिसेंबर २०२२ नंतर बंदी घातली जाईल, अशी घोषणा केली आहे.
अनेक देशामध्ये प्रदुषणातील सर्वात मोठा वाटा हा प्लास्टिकच्या कचऱ्याचा आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि त्याला जाळून नष्टही करता येत नाही, हे प्लास्टिक मानवी शरीरात पोटात जाते, परंतु तो आता आईच्या दुधातही आढळून आल्याने अनेक संशोधकही चिंतेत पडले आहेत. तसेच, अशा परिस्थितीत स्तनपान करणे योग्य की, अयोग्य यांसारखे अनेक प्रश्न संशोधकांना पडले आहेत. दुसरीकडे मात्र आईच्या दुधाचे नवजात बाळाला अनेक फायदे आहेत. त्याच्या आरोग्यासाठी आईच दूध एखाद्या नवसंजीवनी प्रमाणेच आहे. या दूधातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, पडस, खोकला, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात.
या संशोधकांनी सांगितलं की, गरोदर असताना महिला प्लास्टिकमध्ये पॅक करण्यात आलेले पदार्थ, पेय आणि सीफूड्सचे आदींचे सेवन करतात. त्यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेसाठी प्लास्टिकयुक्त उत्पादनांचा वापर करतात. याचा मायक्रोप्लास्टिक दूधात आढळण्याशी कोणता संबंध आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही नाही. तर एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्तन आणि दुधाच्या संशोधनात पॉलीथिलीन, पीव्हीसी व पॉलीप्रॉपिलीन पासून बनविलेले मायक्रोप्लास्टिक्स आढळले, असे म्हटले आहे.
विशेष म्हणजे संशोधनासाठी, रोम, इटलीमध्ये जन्म दिल्यानंतर एका आठवड्यानंतर ३४ निरोगी मातांकडून दुधाचे नमुने घेण्यात आले. त्यातील ७५ टक्के दूधाच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले. एका अहवालात म्हटले आहे की, एका संशोधनात मानवी पेशी, प्रयोगशाळेतील प्राणी आणि सागरी वन्यजीवांवर मायक्रोप्लास्टिक्सचे विषारी परिणाम दिसून आले आहेत. मात्र मानवांवर होणारा परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र प्लॅस्टिकमध्ये अनेकदा जी हानिकारक रसायने असतात, तिच आता आईच्या दुधात आढळून आली आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर असून अत्यंत चिंताजनक आहे. परंतु, स्तनपानाचे फायदे प्रदूषणकारी मायक्रो प्लास्टिक्सच्या मुळे होणाऱ्या हानीकारक परिणामांपेक्षा कितीतरी जास्त आहेत, तसेच, संशोधनात असेही दिसून आले आहे की, ज्या बाळांना बाटलीने दूध दिले जाते, ती नवजात बालके एका दिवसांत लाखो मायक्रोप्लास्टिक्स गिळण्याची शक्यता असते, यावर आता अधिक संशोधन होणार आहे.
Breast Mil Found Microplastic Dangerous Health
Baby Child Infant Human Pollution Scientist