नवी दिल्ली – कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या लसीकरणास येत्या १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. देशभरात या लसीकरणासाठी दोन ड्राय रन यशस्वी झाले आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे. सर्व राज्यांमध्ये त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सर्व प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात देशामध्ये ३ कोटी कोरोना योद्ध्यांचे लसीकरण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. त्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.