*ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे*
*प्रश्न-१ राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांच्या दुकान शनिवारी व रविवारी (वीकेंड ला) उघडे ठेवता येतील का? यासंबंधीच्या मालवाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत का?*
उत्तर – होय. चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्याची दुकाने आठवड्याच्या सात ही दिवस उघडे राहू शकतात. नागरिकांसाठी सकाळी ७:०० ते ११:०० पर्यंत उघडे राहू शकतात व त्यानंतर ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमाने होम डिलिव्हरी करता येईल. या कालावधीनंतर जर कोणीही ही सेवा देताना आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. चिकन, मटण, कोंबड्यांच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
*प्रश्न -२ आंबे विकणारे दुकान सकाळी अकरापर्यंत चालू ठेवल्या जाऊ शकतात का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि वर्गीकरण, पिकवण्याचे काम करता येईल का?*
उत्तर- ग्राहकांना आंबे विक्रीचा काम सकाळी ७:०० ते ११:०० पर्यंत करता येईल. ग्राहकांची फक्त याच वेळेत व्यवसाय करता येईल. त्यानंतर सेवा देताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु श्रेणीकरण, वर्गीकरण व पिकवण्याचे काम यानंतरही चालू ठेवता येईल. सदर आदेशान्वये ११:०० वाजल्यानंतर होम डिलिव्हरी करता येईल किंवा स्थानीय आपत्तीव्यवस्थापन प्रशासनाने दिलेले आदेशांचे पालन करून सदर काम करता येईल. याच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!