मुंबई – राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. काही बाबींना यात सूट देण्यात आली असली री सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नक्की काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार याची संभ्रमावस्था आहे. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांची ही आहेत सविस्तर उत्तरे
—
घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का?
– प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे.
मूव्हर्स एन्ड पॅकर्स च्या मदतीने घरसामान हलवू शकतात का?
– अतिशय अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल. मात्र सर्वसामान्यरित्या याचे उत्तर नाही असेच आहे.
महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का ?
– ब्रेक दि चेनच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून/ स्थानकाहून दुसरीकडे जाऊ शकता.
वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का?
– नाही. केवळ आवश्यक गटातील दुकानच उघडी राहू शकतील
लोकं सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करू शकतात का ?
– नाही.
सिमेंट, रेडी मिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळणार का ?
– आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बांधकाम स्थळ सुरु ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने आण करता येईल. साहित्यांची ऑर्डर ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.
कुरियर सेवा सुरु राहील का ?
– फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरु राहू शकेल
प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काय ?
– स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरु ठेवता येणार नाही.
वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरु ठेवता येईल ?
– नाही
१९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होईल का ?
– ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. ती जूनमध्ये होईल
आवश्यक इ कॉमर्स म्हणजे नेमके काय ?
– सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा ज्या आवश्यक गटात येतात उदा. किराणा , औषधी, अन्न पदार्थ इत्यादी इ कॉमर्स मार्फत वितरित केले जाऊ शकतात
प्लंबर, सुतार, वातानुकूलन, फ्रिज तंत्रज्ञ, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुती करणारे येऊ शकतात का ?
– अगदी टाळण्यासारखे नसेल तर पाणी आणि वीज याबाबतीत सेवा देणाऱ्या व्यक्ती ये जा करू शकतात. त्याचप्रमाणे पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता,उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे. त्याची तात्काळ निकड हवी. यावर केवळ निर्बंध टाकायचे म्ह्णून टाकलेले नाहीत तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे, मग त्यात ती सेवा पुरविणारी व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय देखील आलेच. त्यामुळे या दिलेल्या सवलतीचा विचारपूर्वक आणि अत्यावश्यक असेल तरच उपयोग करावा अन्यथा या सवलतीवर देखील निर्बंध आणावे लागतील.









