इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स सादर करतात. रिलायन्स रिटेलचा लोकप्रिय फॅशन डेस्टिनेशन ‘फॅशन-फॅक्ट्री’ सुद्धा अशाच एका अनोख्या एक्सचेंज फेस्टिव्हलसह पुढे आला आहे. ‘फॅशन-फॅक्ट्री’ मोठ्या ब्रँड्सवरील जबरदस्त सवलतींसाठी ओळखला जातो. २० जुलैपर्यंत सुरू असणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये ग्राहक त्यांच्या जुन्या व अनब्रँडेड कपड्यांच्या बदल्यात ब्रँडेड कपडे व इतर फॅशन प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतील. हा फेस्टिव्हल ‘फॅशन-फॅक्ट्री’च्या सर्व स्टोअर्समध्ये लागू आहे.
ग्राहक जुने डेनिम, शर्ट, टी-शर्ट किंवा मुलांचे कपडे आणल्यास त्यांना त्या बदल्यात एक्सचेंज कूपन मिळतील –
• डेनिमसाठी ₹४०० पर्यंत
• शर्टसाठी ₹२५० पर्यंत
• टी-शर्टसाठी ₹१५० पर्यंत
• मुलांच्या कपड्यांसाठी ₹१०० पर्यंत
हे कूपन वापरून ग्राहक त्यांच्या दैनंदिन गरजांची खरेदी करू शकतील, तसेच Lee, Lee Cooper, John Players, Raymond, Park Avenue, Kano, Peter England, Allen Solly, Van Heusen आणि Louis Philippe यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जेदार ब्रँड्समधून खरेदीची संधी मिळेल. नव्या खरेदीवर ग्राहकांना ५० टक्के पर्यंत सूट देखील मिळणार आहे.
जर तुमच्या कपाटात सुद्धा जुने कपडे भरून ठेवले असतील किंवा तुम्हाला तुमचा लाईफस्टाईल अपग्रेड करायचा असेल, तर ‘फॅशन-फॅक्ट्री’चा हा एक्सचेंज फेस्टिव्हल तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ऑफिससाठी योग्य शर्ट हवे असोत किंवा वीकेंडसाठी स्टायलिश टी-शर्ट – ‘फॅशन-फॅक्ट्री’चा हा उपक्रम नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण करेल.