विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गरिबीमुळे अनेक मुलांचे शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, परंतु सिग्नलवर मोजे विकत असलेल्या एका गरीब मुलाला शिक्षणासाठी खूद्द मुख्यमंत्र्यांनी दोन लाखाची मदत केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात म्हटले आहे की, त्या मुलाने शाळा सोडली असून तो सिग्नलवर मोजे विक्री करताना दिसला. त्यानंतर त्यांनी मुलाला पुन्हा शिक्षण मिळावे, त्याने शाळेत जावे यासाठी त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगितले. दुसर्या वर्गात शिकणार्या मुलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शाळा सोडल्या आणि रस्त्यावर मोजे विकण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओमध्ये एका मुलाने ट्रॅफिक क्रॉसिंगवर मोजे विकत असल्याचे दाखवले आहे. मुलाने मोजेच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेण्यास नकार दिला आहे, कारमध्ये बसलेला एक माणूस त्याला अधिक पैसे देण्यास सांगत आहे. परंतु तो नकार देत आहे, ती व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हीच आहे. त्यांनी मुलाला आपल्या कुटुंबाची आणि इतर खर्चाची काळजी घेण्याचे आश्वासन दिले असून अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. या कुटुंबियांना त्यांनी दोन लाखाची मदत केली आहे.
https://twitter.com/capt_amarinder/status/1390900313440223233