इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते, तसेच प्रेम हे प्रियकर प्रेयसीला पागल किंवा वेडे करते, असे म्हणतात. एका एका तरुणीच्या बाबतीत असेच म्हणता येईल, कारण तिला आपल्या प्रियकराचे चुंबन तथा किस घेताना अडचणी येत होती, त्यामुळे तिने चक्क तिच्या जिभेचा तुकडाच पडला म्हणजे स्वतःच्या जिभेचा काही भाग कापून काढला असे सांगण्यात येते. परदेशातील या विचित्र प्रकारामुळे सोशल मीडियावर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
एका वृत्तानुसार, बाविस वर्षीय सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आणि टिक टोकर क्झेहली जी हिने तिच्या चाहत्याशी बोलताना एक विचित्र किस्सा शेअर केला आहे. त्यामध्ये तिने सांगितले की, जेव्हा ती तिच्या प्रियकराला किस करायची तेव्हा तिला अडचण यायची. नीट किस करता येत नसल्याने तिला खूप वाईट वाटात होते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, तिने आपल्या जिभेची शस्त्रक्रिया करून लिंगुअल फ्रेन्युलम, जीभेखाली असलेला पडदा काढून टाकला आहे.
या तरूण मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या जिभेचा एक भाग शस्त्रक्रियेद्वारे वेगळा करण्यात आला, कारण तो भाग तिच्या कीस करण्याच्या क्षमतेवर परिणाम करत होता. तिच्या प्रेम प्रकरणावर त्याचा वाईट प्रभाव होत होता. याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये लिंगुअल फ्रेन्युलम खूप लहान आणि घट्ट असतो. त्यामुळे काही नागरिकांना बोलण्यात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या लव्ह लाईफवरही होऊ शकतो.
याबाबत ती तरुणी म्हणाली, फ्रेन्युलम काढून टाकणे हा मी आतापर्यंत घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता.’ प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही मिठी मारतात, काही चुंबन घेतात. पण माझ्या जिभेच्या त्या भागामुळे मला स्मूचिंग करायला त्रास व्हायचा. तिची ही शस्त्रक्रिया लिंगुअल फ्रेनेक्टॉमीमध्ये तज्ज्ञ असलेल्या दंतवैद्याने केली आहे, असे समजते .
Boy Friend Girl Friend XEHLI G Kiss