चक्कर व पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यु
नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोन वृध्द व्यक्तींचा शुक्रवारी (दि.२१) चक्कर व पाय घसरून पडल्याने मृत्यु झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. इंद्रकुंड भागात राहणारे दिनेशकुमार सुखदेवराव जोशी (६२ रा.सिध्दी टॉवर) हे शुक्रवारी आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडले होते. या घटनेत दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक देवरे करीत आहेत. दुसरी घटना काठेगल्लीत घडली. छन्नो सनेरा पवार (७० रा.पदमावती निवास) या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्या बेशुध्द झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
…
राणेनगरला महिलेची आत्महत्या
नाशिक : राणेनगर भागात राहणा-या ४४ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अनिता मारूती नेमाणे (रा.श्री अपा.राणेनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. नेमाणे यांनी शुक्रवारी (दि.२१) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. गणेश घारे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.