प्रतिनिधी, पुणे
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”माॅडर्न इंडीयन डिप्लोमॅटीक अँन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये ते संशोधन करणार आहेत.
फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. याचबरोबर इंडीयन इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलाॅजी (आय.आय.टी ) गुवाहाटी, आसाम मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली तसेच यापुर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयु) दिल्ली मधुन “मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज” निवड झाली आहे.
मराठी माध्यमांतुन शिक्षण घेवुनही आय.आय.टी.प्रवेश , नेट , गेट आणि आता भारतातील नामांकीत असणार्या आय.आय.टी मध्ये संशोधनासाठी निवड झाली आहे. विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवुन नवनाथ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. पुरंदर तालुक्यातील बोपगाव ह्या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातील नवनाथ यांचा शैक्षणिक आलेख आणि गरुडक्षेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
नवनाथ यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण, आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावात वर्गखोल्या नसल्याने गावातील मंदिरात बसुन पुर्ण केले. अकरावी -बारावीत असताना शेतातील कामे करणे, डोंगरावर जनावरांना चरायला घेऊन जाणे, तिकडे इंग्रजी पुस्तकांचे वाचन करणे, प्रवास करताना बसमधून ये-जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दभंडार वाढविण्यासाठी कायम भर देणे याचा नवनाथ यांना मोठा होत गेला आहे.
पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन शिक्षण दिल्यानंतरच ,खासगी शिकवणीसाठी लाखो रुपयांची फी भरल्यानंतरच मुलं -मुली यशस्वी होतात हे चुकीचे असल्याचे सिदध करुन दाखवले आहे. आत्तापर्यंतचा शैक्षणिक आलेख कोणताही क्लास न लावता उंचावला आहे. परिस्थिताचा बाऊ न करता कोणतीही कारणं न सांगता भरपुर मेहनत आणि ज्या क्षेञात जायचे ,त्या क्षेञात स्व: ला पुर्णपणे झोकुन दिले तर सर्वसामान्य गोरगरिब शेतकरी कुटुंबातील मुलं -मुली देखील देखील आपल्या आई- वडीलांचे नाव उंचावुन समाजात चांगले आदर्श निर्माण करु शकतात असे नवनाथ यांचे म्हणणे आहे.